नगराध्यक्षांनी समयसूचकता दाखवत विजेचा शॉक लागलेल्या मुलाचे वाचवले प्राण!

त्या ठिकाणी काय झाले आहे, हे पाहण्यासाठी त्या मोटारीमधून खाली उतरल्या.
Karjat's chairman of council saves life of four-and-a-half-year-old boy
Karjat's chairman of council saves life of four-and-a-half-year-old boy

कर्जत : सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या नगराध्यक्षा म्हणून रायगड जिल्ह्यात वेगळी ओळख असलेल्या कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी एका घटनेत समयसूचकता दाखवत लहानग्याचे प्राण वाचवले. या मुलाला विजेचा धक्का लागला होता. जोशी यांनी समयसूचकता दाखवत एका लाकडाच्या साहाय्याने या मुलाला विजेच्या वाहिनीपासून दूर करत तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही घटना सोमवारी (ता. ६ सप्टेंबर) घडली. (Karjat's chairman of council saves life of four-and-a-half-year-old boy)

कर्जत तालुक्यातील अरवंद येथे जैन समाजाच्या वतीने गो शाळा चालविली जाते. बैल पोळ्याच्या निमित्ताने सोमवारी (ता. ६)  नगराध्यक्ष जोशी ह्या गो शाळेत गेल्या होत्या. त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या कर्जतकडे वाहनाने निघाल्या होत्या. अरवंद गावाच्या पुढे त्यांना मोठी गर्दी दिसली. त्यामुळे त्या ठिकाणी काय झाले आहे, हे पाहण्यासाठी त्या मोटारीमधून खाली उतरल्या. त्या वेळी त्यांना साडेचार वर्षांच्या मुलाला विजेचा धक्का लागल्याचे दिसून आले. 

जमलेल्या गर्दीतील लोक नुसताच आरडाओरड करत होते. त्यावेळी नगराध्यक्षा जोशी यांनी समयसूचकता दाखवत लाकडाच्या सहायाने त्यांनी मुलाला वीज वाहिनीपासून दूर केले. त्यानंतर त्या मुलाला आणि त्याच्या आईला मोटारीमधून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्या.  प्रवासादरम्यान त्या मुलाला तोंडाने श्वास देण्यास त्याच्या आईला त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी मुलाच्या छातीवर दाब देत त्याचा श्‍वास सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या मुलाने थोड्या वेळाने डोळे उघडले. 

रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णलयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज बनसोडे यांना तातडीने बोलावून घेऊन मुलावर उपचार करण्यास सांगितले. त्याच्यावर सध्या कर्ज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती सध्या चांगली असून त्याला चोवीस तास वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. बनसोडे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com