खुमखुमी असेल तर तारीख, वेळ ठरवा सर्व उत्तरे देतो : शंभूराज देसाईंचे पाटणकर पितापुत्रांना आवाहन 

आम्ही किती मदत दिली कुणाला दिली याची मापे काढण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही आपदग्रस्तांना किती मदत दिली हे एकदा मतदारसंघातील जनतेसमोर जाहीरपणे मांडा. तालुक्‍याचे प्रशासन माझे देखरेखीखाली आठ दिवस पाण्यातील जनतेला दिलासा देत होते. तेव्हा तुमचे पिताश्री प्रशासनावर वृत्तपत्रातून टिका करण्यात धन्यता मानत होते - शंभूराजे देसाई
खुमखुमी असेल तर तारीख, वेळ ठरवा सर्व उत्तरे देतो : शंभूराज देसाईंचे पाटणकर पितापुत्रांना आवाहन 

सातारा : ''सत्यजितसिंह पाटणकर महाशय, जनतेने तुम्हाला घरी बसवून मला चांगल्या मताधिक्‍क्‍याने निवडून दिले आहे. यावरुनच तुमची निष्क्रीयता दिसून येते. माझ्यावर आरोप करताना जरा अभ्यास करा. बघेल तेव्हा तेच तेच आरोप करण्यापेक्षा हिंम्मत असेल तर माझेवरील आरोपाची उत्तरे घ्यायला जनते समोर या. मी अनेकदा समोरासमोर येण्याचे आव्हान पाटणकर पितापुत्रांना दिले होते. पण ते त्यांनी स्विकारलेले नाही. तुम्हाला सर्व बाबींची उत्तरे हवी असतील आणि खरोखरच खुमखुमी असेल तर तारीख, वेळ तुम्हीच ठरवा मी सर्व उत्तरे देण्यास तयार आहे,'' असे आव्हान पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकर पितापुत्रांना दिले. 

देसाई म्हणाले, ''पाटणच्या युवा नेत्यांचा बालिशपणा वयाची पन्नाशी ओलंडली तरी कधी जाणार हे न सुटणारे कोडे आहे. पाटणकरांनी माझी काळजी करण्यापेक्षा स्वत:ची काळजी करावी. मी पुरपरिस्थितीत फुटभर पाण्यातून अथवा 10 फुट पाण्यातून किंवा चिखलातून जावू देत, सत्यजितसिंह मी मतदारसंघावर आलेल्या पुरपरिस्थितीच्या व अतिवृष्टीच्या संकटात जनतेच्या मदतीला धावून गेलो. तसेच नुकसान झालेल्या तळागाळातल्या आपदग्रस्तांना वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेची पुर्नबांधणी करण्याकरीता प्रयत्न केले. तुमच्यासारखी नुसते नावापुरते पहाणी दौरे करुन मदतीची नौटंकी केली नाही.''

ते पुढे म्हणाले, ''त्यांच्या पक्षाकडून मदत आली ती ही तोकडी ती दयायची कोणाला, माजी आमदार पुत्रांनाच मदत करायला कुणी येईना, ते काय दुसऱ्याला मदत देणार? आम्ही किती मदत दिली कुणाला दिली याची मापे काढण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर, तुम्ही आपदग्रस्तांना किती मदत दिली हे एकदा मतदारसंघातील जनतेसमोर जाहीरपणे मांडा. तालुक्‍याचे प्रशासन माझे देखरेखीखाली आठ दिवस पाण्यातील जनतेला दिलासा देत होते. तेव्हा तुमचे पिताश्री प्रशासनावर वृत्तपत्रातून टिका करण्यात धन्यता मानत होते. त्याच प्रशासनाने पुरपरिस्थितीत चांगले काम केले म्हणून १५ ऑगस्टला प्रशासनाचे सत्कार करण्याची नौटंकी तुम्ही करीत होतात.''  तुम्हा पाटणकर पितापुत्रांची केवळ स्टंटबाजी असून या स्टंटबाजीचा मतदारसंघातील जनतेला काडीचाही उपयोग नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

हे देखिल वाचा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com