एकनाथ खडसेना मंत्रीमंडळात घेण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील : फडणवीस 

पिंपरी येथील भूखंड प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसेंना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 'क्लिन चिट' मिळाल्यानंतरही अद्याप खडसे यांचा राज्याच्या मंत्री मंडळात समावेश झालेला नाही. आता राज्य विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. तरीही खडसे मंत्रीपदापासून दूरच आहेत.
एकनाथ खडसेना मंत्रीमंडळात घेण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील : फडणवीस 

जळगाव : माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळात घेण्याबाबत वरीष्ठ नेतेच निर्णय घेतील असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भुसावळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पिंपरी येथील भूखंड प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसेंना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 'क्लिन चिट' मिळाल्यानंतरही अद्याप खडसे यांचा राज्याच्या मंत्री मंडळात समावेश झालेला नाही. आता राज्य विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. तरीही खडसे मंत्रीपदापासून दूरच आहेत. 

महाजनादेश यात्रा जळगाव जिल्ह्यात आहे. भुसावळ येथे मुख्यमंत्री मुक्कामी होते.हॉटेल राधाकृष्ण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते. यावेळी खडसे यांच्या मंत्रीमंडळात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले, ''आगामी विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंना राज्याच्या मंत्रीमंडळात ठेवायचे की केंद्राच्या मंत्रीमंडळात घ्यायचे याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com