Shivaji Chumbhale - Seema Hirey
Shivaji Chumbhale - Seema Hirey

नाशिक पश्‍चिम मतदारसंघात युतीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी तर आमदार सीमा हिरे प्रचारमग्न 

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून जोरदार तयारी केली होती. शिवसेना नेत्यांशी जवळीक वाढवली होती. मात्र ते तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना ते 'एसीबी'च्या जाळ्यात अडकले. त्यांना अटक झाल्याने ते स्पर्धेतून बाद झाले. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांना गुदगुल्या झाल्याचे चित्र आहे. एकंदरच या मतदारसंघात युतीत इच्छुकांची भाऊगर्दी आहे. मात्र त्याचा विचार न करता विद्यमान भाजप आमदार सीमा हिरे सध्या प्रचारमग्न झाल्या आहेत. 

शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी पक्ष सांगेल ती दिशा अशी भूमिका घेतली असली तरी कार्यकर्त्यांमार्फत त्यांचा प्रचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा सिडकोत आयोजित करून त्यांनी नेत्यांसमोर शक्तिप्रदर्शन केले होते. शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांचीही जोरदार फिल्डींग आहे. स्थायी समितीचे माजी सभापती मामा ठाकरे, दिलीप दातीर हे शिवसेनेत उमेदवारीची अपेक्षा ठेऊन आहेत. 

गणेशोत्सवानंतर कुठल्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होणे शक्‍य आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. भाजप व शिवसेनेची युती होईल किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही. आपल्यालाच उमेदवारी मिळेल हे डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक इच्छुक तयारीला लागला आहे. पश्‍चिम मतदारसंघात इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे एकाला तिकीट मिळाले तरी इतरांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. विद्यमान आमदार हिरे भाजपच्या आहेत. त्यामुळे भाजपकडे इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली. यंदाच्या निवडणुकीतही 'मोदी फॅक्‍टरचा' जोर असला, तरी आर्थिक मंदीमुळे बंद पडणारे कारखाने त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. 

भाजपकडून इच्छुक असलेले प्रदीप पेशकार, महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील, निमाचे नवनियुक्त अध्यक्ष शशिकांत जाधव, डॉ. प्रशांत पाटील, गोपाळ पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्याकडून जोरदार कार्यक्रम, उपक्रम, प्रचारहोत आहे. भाजपमधील इच्छुकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले दिलीप भामरे यांचीही तयारी सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर हिरे मात्र प्रचारमग्न झाल्या आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com