माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर कधी जाणार?, देशमुख म्हणतात...
Anil Deshmukh - Letter

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर कधी जाणार?, देशमुख म्हणतात...

माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभासुद्धा दिली आहे.

मुंबई : ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister of the State Anil Deshmukh हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीसाठी थेट हजर न राहता वकिलांमार्फत हजर राहत आहेत. अश्यातच आता ते ईडीसमोर कधी येणार हे त्यांनी स्वतःहून प्रसिद्धीपत्रकामार्फत जाहीर केले आहे. 

प्रसिद्धीपत्रकानुसार अनिल देशमुख यांनी, 'माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभासुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः EDच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे म्हटले आहे.

अनिल देशमुख म्हणाले, माझ्या राजकीय सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शनचे पालन केले आहे. हा मला फसवण्याचा डाव लवकरच उधळला जाणार आहे. देशमुख यांच्या अडचणी दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. अनिल देशमुख यांची जी प्रकरण आहेत, त्यावर सुनावणी होणार आहे. ईडीला वारंवार सांगितले आहे की, आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही ईडीला सहकार्य करीत आहोत. तरीही वारंवार का आम्हाला समन्स दिले जात आहेत, असा सवाल अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग Indrapal Singh यांनी माध्यम प्रतिनिधींना कालच सांगितले होते. 

अनिल देशमुख आणि ऋषीकेष अनिल देशमुख यांचे उत्तर दाखल केले आहे. आम्ही सातत्याने सांगतोय की आमची याचिका पेंडिंग आहे आणि आता याचिका दाखल झाली आहे. ती याचिका बोर्डवर येऊ द्या, त्यानंतर न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील. त्याप्रमाणे आज घडामोडी झाल्या. सध्याच अटकपूर्व जामिनासाठी कुठलीही कार्यवाही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’ने यापूर्वीच केला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी  येथील घराची ईडीने झाडाझडतीही घेतली गेली आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.