अजित पवारांनी घेतली पालघरच्या संस्कृतीची दखल....

जिल्ह्यात कार्यालय सुसज्य उभारण्यात आले असले तरी या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी येणाऱ्या गोरगरीब जनतेशी कसे वागतात. त्यांना कितपत न्याय देतात यावरच खऱ्या अर्थाने या कार्यालयाची उंची ठरणार आहे.
अजित पवारांनी घेतली पालघरच्या संस्कृतीची दखल....
Ajit Pawar took notice of the culture of Palghar ....

विरार : पालघर जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन आणि वसई विरार महापालिकेतील विविध कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अजित दादा पवार यांनी मात्र, आपल्या भाषणातून वसईची केळी, डहाणूचे चिकू आणि वारली चित्रकलेचा उल्लेख करून या ठिकाणच्या संस्कृतीची दखल घेतल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. Ajit Pawar took notice of the culture of Palghar ....

पालघर जिल्ह्याच्या निर्मितीत आपला ही हात असल्याचे सांगून अजित पवार यांनी जिल्ह्याच्या निर्मितीचा इतिहास सांगतानाच या ठिकाणची संस्कृतीचा उल्लेख हि त्यांनी केला. यावेळी त्यांनी वसईची प्रसिद्ध केळी, डहाणूची चिकू, आणि येथील पर्यटन स्थळांचा याचा उल्लेख करून आता याठिकाणच्या प्रयत्न वाढीला प्रोत्साहन देण्याचे सांगितले. 

त्याचप्रमाणे येथील वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून काही दिवसापूर्वी या कलेला राष्ट्रपती मिळाल्याचा उल्लेख करून त्याचा उपयोग पर्यटनासाठी करता येईल असे सांगितले. जिल्ह्यात कार्यालय सुसज्य उभारण्यात आले असले तरी या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी येणाऱ्या गोरगरीब जनतेशी कसे वागतात. त्यांना कितपत न्याय देतात यावरच खऱ्या अर्थाने या कार्यालयाची उंची ठरणार आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी जिल्हा निर्मितीसाठी योगदान देणाऱ्यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in