अकोला रेल्वे स्थानकावर ४३ लाख रुपये जप्त, हवाल्याचे असण्याची शक्यता...

पोलिस कर्मचारी तैनात केल्यामुळे तो त्याच्या उद्देशात यशस्वी होऊ शकला नाही आणि पकडला गेला. ज्यांच्या ताब्यात इतकी मोठी रोकड मिळाल्याबद्दल आणि ती कोणत्या उद्देशाने रेल्वेने पाठवली होती.
Cash
Cash

अकोला : रेल्वे स्थानकावर Rilway Station 43 लाख रुपये रोख रक्कम रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केली. एका व्यक्तीला आरपीएफने ताब्यात घेतले आहे. ही रक्कम हवाल्याची असल्याचा‌ संशय असल्याने अकोला जीआरपी यांना आरोपीसह सुपूर्द केली आहे. Cash has been hended over to the grp along with the accused याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अकोला रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या बी चार कोचमध्ये अज्ञात प्रवाशाला 43 लाख ३०० रुपये रोख रक्कम देण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षकांनी अनधिकृतपणे रोख रक्कम आंगडीया कुरियरने नेणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांसह सापळा रचला. संशयितावर नजर ठेवण्यात आली. रेल्वे पोलिस कर्मचारी बी. आर. अंभोरे यांनी सुमारे काल रात्री 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास त्या संशयिताला ओळखले व दुसरा कर्मचारी लक्ष्मीनारायणच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला काळ्या रंगाची जड पिशवी घेऊन आरपीएफ पोलिस स्टेशन अकोला येथे आणण्यात आले. 

या संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याने मनोज हरीराम शर्मा, वय 22 वर्षे, शास्त्रीनगर शासकीय दूध डेअरीच्या मागे राहणारे आणि या रोख बॅगचे नाव दि. पप्पी शॉप, स्टेशन रोडच्या मालकाने बोगी B- 4 च्या दारात उभे राहून अज्ञात व्यक्तीला हात देण्याचे हातवारे केले. पण पोलिस कर्मचारी तैनात केल्यामुळे तो त्याच्या उद्देशात यशस्वी होऊ शकला नाही आणि पकडला गेला. ज्यांच्या ताब्यात इतकी मोठी रोकड मिळाल्याबद्दल आणि ती कोणत्या उद्देशाने रेल्वेने पाठवली होती. याबद्दल कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत आणि त्याने ही रोकड स्वतःची किंवा त्याच्या मालकाची असल्याबद्दल कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रे सादर केली नाहीत. बाबतीत कर विभागाशी  समन्वय करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या काळात अशा कारवाया होणे ही रोजचीच बाब असते. पण आता कुठेही निवडणूक नाही. तरीही येवढी मोठी रक्कम रेल्वेने नेण्यात येत असल्याने विविध तर्क लावले जात आहे. हा कुणाचा काळा पैसा आहे, याचा तपास आता यंत्रणा करीत आहे. अटक केलेल्या व्यक्तीपासून अद्याप कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in