आमदार शहाजी पाटील हे काय बोलले? : म्हणे सांगोल्याची पाणी आंदोलने थांबविणार!

निसर्गाची किमया असो वा राजकीय नियोजन जनतेचा पाणी संघर्ष सध्यातरी थांबला असुन यावर्षी तरी सांगोला तालुक्यातील जनतेला पाणी मिळाले आहे.
What did MLA Shahaji Patil say? : Says Sangola water agitation will stop!
What did MLA Shahaji Patil say? : Says Sangola water agitation will stop!

सांगोला : सांगोला म्हटलं की 'दुष्काळ' हा शब्द जोडला जातोच. येथील कमी पर्जन्यामुळे सर्वसामान्यांना पिण्याचा व शेताच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावतो. पाणी प्रश्नावरच येथील राजकारण फिरले व फिरविले जाते. पाण्यासाठीच तालुक्यात आजपर्यंत अनेक आंदोलने, संघर्ष यात्रा व पाणी परिषदा घेतल्या गेल्या. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी यापुढे तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी आंदोलने करावी लागणार नसल्याचे प्रतिपादन केले. यामुळे तालुक्यातील अपूर्ण पाण्याची योजना पूर्ण होणार? सांगोल्यातील जनतेचा पाण्यासाठीचा संघर्ष थांबणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे. What did MLA Shahaji Patil say? : Sangola water agitation will stop!

 तालुक्यातील कोणतीही निवडणूक असली तरी इतर प्रश्नापेक्षा ती पाणी प्रश्नावरच जास्त गाजते. निवडणुकीत पाणी योजनांवरच राजकीय उणे-धुणे काढले जाते. नुकतेच टेंभू योजनेचे सोडलेले पाणी मेथवडे येथे पोचल्यानंतर पाणी पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी यापुढे आंदोलने, संघर्ष करावा लागणार नसल्याचे सांगितले होते. टेंभू, म्हैसाळ योजना, नीरा उजवा कालवा इत्यादी योजनेतील पाणी पुरेशा प्रमाणात आणि वेळेत देण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. 

माण नदीवरील सर्व बंधारे भरून काढले असुन चिंचोली येथील तलावात लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे. बुद्धेहाळ तलावात पाणी सोडण्यात आले आहे. पारे, जवळा येथील छोटी-मोठी तलाव भरून घेतली आहेत. राजेवाडी तलावाचे आतापर्यंत तीन वेळा पाणी मिळाले आहे. सर्व योजनांतील उन्हाळी आवर्तने पुरेशा प्रमाणात देण्यासाठी प्रयत्न केले.

पावसाळी पाण्याचे नियोजन केले असुन यापुढेही कायमस्वरूपी पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे तुटलेल्या बंधाऱ्यांचे कामांसाठी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला आहे. तालुक्यातील विविध बंधाऱ्यावर बॅरिगेट्स (दारे) ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी साठवण्यास मोठी मदत होणार आहे. निसर्गाची किमया असो वा राजकीय नियोजन जनतेचा पाणी संघर्ष सध्यातरी थांबला असुन यावर्षी तरी  सांगोला  तालुक्यातील जनतेला पाणी मिळाले आहे.


जेष्ठ नेते गणपतरांवाचा पाणी संघर्ष ...

तालुक्यात विक्रमी वेळा एकाच पक्षातून आमदार झालेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्याच्या विविध योजनांसाठी, योजना पूर्ण करण्यासाठी, दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी आतापर्यंत मोठा संघर्ष केला आहे. तालुका व तालुक्याबाहेर पाणी चळवळी, पाणी संघर्ष यात्रा व पाणी परिषदा घेतल्या होत्या.

परंतु सध्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार असल्याने सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मोठा फायदा होत आहे. विविध अपुर्ण योजनांना निधी मिळवणेसह त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असल्याने वेळेत पाणी मिळवण्यासाठी संघर्ष न करता पाणी मिळाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. सत्ता कोणाचीही असो तालुक्यातील पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण होऊन कायमस्वरूपी पाणी मिळावे हीच येथील जनतेची अपेक्षा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com