आता खासदार संभाजीराजेंना कदमबांडेंचाही पाठिंबा!

मराठा समाजाला वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला पाहिजे, तरच छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय ठरेल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या यासंबंधी भूमिकेला पाठिंबा असल्याचे पत्र येथील माजी आमदार तथा छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजवर्धन कदमबांडे यांनी दिले.
Kadambande- Sambhajiraje
Kadambande- Sambhajiraje

धुळे : मराठा समाजाला वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला पाहिजे, (Maratha community should get resrvation as per increase population) तरच छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय ठरेल. (It will be coherent to Shahu Maharap principles) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या यासंबंधी भूमिकेला पाठिंबा असल्याचे पत्र येथील माजी आमदार तथा छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांनी दिले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाशिक येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे मूक आंदोलन झाले. या आंदोलनास धुळे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चानेही पाठिंबा दिला. नंतर राज्य समन्वयकांच्या बैठकीत धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात अनेक सूचना मांडल्या. खासदार संभाजीराजे यांना धुळे येथील संभाव्य आंदोलनासाठी निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले.

माजी आमदार कदमबांडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील संभाजीराजेंना पाठिंब्याचे पत्र दिले. मोर्चाचे येथील कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव निंबा मराठे, सहखजिनदार वीरेंद्र मोरे, समन्वयक विनोद जगताप, रवींद्र शिंदे, समन्वयक विकास बाबर, जालिंदर जाधव, जितेंद्र इखे यांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केले. श्री. कदमबांडे यांच्या पाठिंब्याच्या पत्राचे संभाजीराजेंनी वाचन करून सुसंगत भूमिकेचे स्वागत केले.

श्री. कदमबांडे यांनी पत्रात म्हटले आहे, की छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील मागासवर्गीयांचा सर्वप्रथम विचार करून त्यांना आरक्षण दिले. सर्व बहुजनांना सोबत घेऊन मराठ्यांनाही त्यांनी आरक्षण दिले. त्यामुळे एससी, एसटी व ओबीसींच्या कुठल्याच आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला पाहिजे, तरच छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय ठरेल.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजे जे काही प्रयत्न करीत आहात त्यास पाठिंबा आहे. मूक आंदोलनात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्र सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, प्रसंगी संसदेच्या सभागृहात प्रखरपणे विषय मांडणार असल्याचे सांगितले. या भूमिकेचे खासदार संभाजीराजेंनी स्वागत केले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com