भाजप नगरसेवकांच्या पक्षांतराच्या अफवा

महापालिका निवडणुका जवळ येत असताना पक्षांतर्गत राजकारण तापले आहे. अंतर्गत राजकारणातून आता थेट नगरसेवकांच्या पदांचा बळी देण्याची चाल खेळली जात असून, भविष्यात अडचणीचे ठरणाऱ्या नगरसेवकांचे तिकीट आत्तापासूनच कापण्यास सुरवात झाली आहे.
NMC
NMC

नाशिक : महापालिका निवडणुका जवळ येत असताना पक्षांतर्गत राजकारण (In Party politics is on High mode) तापले आहे. अंतर्गत राजकारणातून आता थेट नगरसेवकांच्या पदांचा बळी देण्याची चाल खेळली जात (Maney corporators may Exlude to contest election) असून, भविष्यात अडचणीचे ठरणाऱ्या नगरसेवकांचे तिकीट आत्तापासूनच कापण्यास सुरवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेत भाजपचे अनेक नगरसेवक जाण्यास इच्छुक असल्याच्या अफवा पसरविल्या जात (Rumors about unwilling of corporators) आहेत. या अफवांमुळे वैतागलेल्या काही नगरसेवकांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच तक्रारींचा पाढा वाचला आहे.

महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता आहे. त्यापूर्वी भाजपच्या नगरसेवकांची संख्या चौदाच्याही पुढे जात नव्हती. परंतु, मोदी लाटेत अनेकांच्या पदरी नगरसेवकपद पडले. भाजपने सत्ता मिळविताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व शिवसेनेतून अनेक नेते आयात करून त्यांना तिकिटे दिली व ते निवडूनही आले. परंतु, आता तेच नगरसेवक त्यांच्या कामांमुळे मोठे होत असल्याने व पक्षात त्यांचे स्थान भक्कम होत असल्याने भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने त्यांचे मोठेपण अवघड होताना दिसत आहे. त्यामुळे काही नगरसेवक भाजप सोडून शिवसेनेत जात असल्याच्या अफवा पसरविल्या जात असून, पक्षाच्या वरिष्ठांचेदेखील कान भरविले जात आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कर्नोपकर्णी खबर पोचविण्याचे काम होत असल्याने पक्षात अस्वस्थता वाढली आहे. त्यातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्याचे समजते.

महाजन-रावल संघर्षासाठी
यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काही नगरसेवकांना स्थायी समिती सभापती व सभागृहनेते पद मिळाल्याने त्यांच्या विरोधात वावड्या उठविण्यात आल्या होत्या. आता पूर्वाश्रमीच्या मनसेच्या मुकेश शहाणे यांचे भाजपमध्ये वजन वाढत असताना त्यांच्याविरोधात शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या कंड्या पिकविल्या जात आहेत. यामागे भाजपच्या आजी- माजी आमदारांचा हात असल्याचे बोलले जात असून, माजी मंत्री गिरीश महाजन व प्रभारी जयकुमार रावल यांच्यात संघर्ष घडवून आणण्यासाठी वावड्या उठविण्याचे प्रयोग होत असल्याचा संशय पक्षात व्यक्त होत आहे.

...
नेत्याची कानउघाडणी
भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या एका वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात असल्याचे निमित्त करून वावड्या उठविण्याचे प्रकार होत आहेत. याच विषयावर एका बॅंकेच्या बैठकीच्या निमित्ताने विषय निघाल्यानंतर वावड्या उठविणाऱ्या भाजपच्या नेत्याची भ्रमणध्वनीवरून कानउघाडणीदेखील करण्यात आल्याचे समजते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com