महापौर निवडीबाबत काॅंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा `बाॅंब`, अद्याप उमेदवार जाहीर नाहीच

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणूक एकत्रित लढविली. त्यामुळे महापालिकेत असलेल्या नगरसेवकांची संख्या ही दोन्ही पक्षांची मिळून आहे.
Deep Chawan.jpg
Deep Chawan.jpg

नगर : ‘‘नगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर जागावाटपाचा फॉर्म्युला अजून महाविकास आघाडीने निश्चित केला नाही. तीनही पक्षांचे प्रमुखच एकत्र येऊन उमेदवार जाहीर करतील. यासंदर्भातील कोणताही आदेश मला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मिळालेला नाही,’’ असे काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण (Deep Chawan) यांनी सांगितले. (The 'bomb' of the Congress city district president regarding the mayoral election, the candidate has not been announced yet)

चव्हाण म्हणाले, ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणूक एकत्रित लढविली. त्यामुळे महापालिकेत असलेल्या नगरसेवकांची संख्या ही दोन्ही पक्षांची मिळून आहे. ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून २४ नगरसेवक आहेत. भाजप व शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांची संख्या स्वतंत्र म्हणता येते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची संयुक्तपणे महाविकास आघाडी आहे. ही आघाडी तयार होताना जागावाटपाच्या वेळी तीनही पक्षांच्या प्रमुखांची समन्वय समिती निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

थोरात या समन्वय समितीत आहेत. महापौर, उपमहापौरपदाच्या जागावाटपावर तीनही पक्षांच्या प्रमुखांची बैठक झालेली नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, तसेच युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडून उमेदवारी कोणाला देण्यात आली, याबाबत अजून कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवारच ठरलेला नाही.’’

हेही वाचा..

आरक्षण पूर्ववत करुन आम्हाला न्याय द्यावा !

पारनेर : ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे आरक्षण पूर्ववत करून ओबीसी प्रवर्गास न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील ओबीसी सघटनांच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली.

सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधवांनी आज (ता. २४) नायब तहसीलदार अविनाश रणदिवे यांना निवेदन दिले. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी समाजावर या निर्णयाने अन्याय होणार आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्यास ओबीसी समाजाची फार मोठी हानी होणार आहे. हे आरक्षण पूर्वत न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या वेळी माजी सभापती खंडू भूकन, पंचायत समितीचे माजी सदस्य किसन रासकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे, सरचिटणीस गुलाबराव गायकवाड, बबनराव गुमटकर, पृथ्वी कोल्हे, प्रवीण व्यवहारे, दादाभाऊ रसाळ, श्रीधर गाडीलकर, शुभम भांबरे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com