विवेक कोल्हे यांच्या रुपाने तिसरी पिढीचे जिल्हा बॅंकेत 

आज आपल्या उमेदवारी अर्जाची माघार घेतल्याने कोल्हे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.
vivek kolhe1.jpg
vivek kolhe1.jpg

कोपरगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीन कोल्हे यांची आज बिनविरोध निवड झाली. कोल्हे घराण्यातील तिसरी पिढी विवेक कोल्हे यांच्या रुपाने जिल्हा बॅंकेत पदार्पण करीत आहे.

यापूर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी मागील वीस वर्षे जिल्हा बॅंकेवर प्रतिनिधीत्व केले आहे. बॅंकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहे. 

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून विवेक कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अलकादेवी राजेंद्र जाधव यांनी यापूर्वी आपला अर्ज माघारी घेतला असून, आज किसन चंद्रभान पाडेकर आणि देवेंद्र गोरख रोहमारे यांनी आज आपल्या उमेदवारी अर्जाची माघार घेतल्याने कोल्हे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. 

विवेक कोल्हे हे कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष असून, इंडियन फारमर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेवर जनरलबॉडी सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, शेतकरी सहकारी संघ लि., संजीवनी सहकारी पतसंस्था लि. आदी संस्थाचे संचालक म्हणून ते कार्यरत आहे. कोल्हे यांचे शिक्षण बी. ई. सिव्हिलपर्यंत झालेले आहे. 

विवेक कोल्हे यांच्या रुपाने एक तरुण नेतृत्व जिल्हा बॅंकेवर जात असल्याने तालुकाभर युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विवेक कोल्हे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com