जिल्हा बॅंकेवर कोपरगावमधून विवेक कोल्हे बिनविरोध  - Vivek Kolhe from Kopargaon unopposed on District Bank | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेवर कोपरगावमधून विवेक कोल्हे बिनविरोध 

मुरलीधर कराळे
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

संगमनेर मतदारसंघातून रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे व दिलीप काशिनाथ वर्पे, श्रीगोंदे तालुक्‍यातून राजेंद्र शिवाजीराव नागवडे व प्रणोती राहुल जगताप तर श्रीरामपूरमधून कोंडिराम बाबाजी उंडे यांनी आज अर्ज मागे घेतले.

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल झालेले अर्ज माघारी घेण्याची उद्या (ता. 11) अखेरची मुदत आहे. आज 18 जणांनी अर्ज मागे घेतले. कोपरगावमधून तीन जणांनी अर्ज मागे घेतल्याने विवेक बिपीन कोल्हे हे बिनविरोध निवडून आले. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. 

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून आज कोपरगावमधून किसन पाडेकर, देवेंद्र रोहमारे, बिपीन कोल्हे यांनी आज अर्ज मागे घेतले. या तालुक्‍यातून मतदारसंघात विवेक कोल्हे यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यामुळे ते आता बिनविरोध निवडून आले आहेत. 

हेही वाचा... दोन दिवसांच्या माघारीचा खेळ

आज पारनेर तालुक्‍यातून आमदार नीलेश ज्ञानदेव लंके यांनी अर्ज मागे घेतला. येथे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदय शेळके, भाजपचे राहुल शिंदे व शिवसेनेचे रामदास भोसले यांचे अर्ज बाकी आहेत. आमदार लंके यांनी उदय शेळके यांच्यासाठी अर्ज मागे घेतला असला, तरी तीन जणांपैकी उद्या कोण अर्ज मागे घेतात, याबाबत खलबते होणार आहेत. 

संगमनेर मतदारसंघातून रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे व दिलीप काशिनाथ वर्पे, श्रीगोंदे तालुक्‍यातून राजेंद्र शिवाजीराव नागवडे व प्रणोती राहुल जगताप तर श्रीरामपूरमधून कोंडिराम बाबाजी उंडे यांनी आज अर्ज मागे घेतले. 

हेही वाचा... मंत्री गडाख यांचाच झेंडा

शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्थांच्या मतदारसंघातून आज नऊ जणांनी नामनिर्देशनपत्र माघार घेतले. त्यामध्ये भानुदास मुरकुटे, सुभाष गुंजाळ, माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, मधुकर नवले, राजेंद्र नागवडे, संभाजी गावंड, उत्तमराव चरमळ, केशव भवर व अरुण येवले यांचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी चुरस वाढत आहे. यापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. एक बिनविरोध झाल्यात जमा आहे. तथापि, इतर मतदारसंघातून तसेच इतर जागांमध्ये चुरस कशी वाढणार, याबाबत उत्सुकता आहे. उद्या अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख