Government Desided give crop loan for kharif on the understanding of getting loan waiver Says Minister Balasaheb Patil | Sarkarnama

कर्जमाफी मिळाली समजून खरिपासाठी पिककर्ज देणार : बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 मे 2020

राज्य सहकारी बँकांच्या वतीने व काही बँकांनी स्वतःच्या निधीतून रक्कम उपलब्ध करून देणार आहेत. कर्ज खात्यात रक्कम व त्याचे व्याजाची रक्कम देण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.

कऱ्हाड : शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतिम यादीत नावे असूनही कोरोनाच्या संकटामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा यादीतील लाभार्थी पात्र कर्जदारांना जिल्हा बँका व अन्य बँकांचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे गृहीत धरून खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज येथे दिली. राज्यातील सुमारे अकरा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून आठ हजार कोटीच्या दरम्यान ही रक्कम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील महाराष्‍ट्र विकास आघाडी शासनाने महात्मा जोतिबा फुले यांच्या नावे अल्पमुदीतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना सुरू केली. त्याची कार्यवाही सुरू झाली. मात्र दुर्देवाने देशात व राज्यात कोरोनाच्या संकट आले.

हेही वाचा ः शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर तसाच राहाणार, कोरोनामुळे तुर्तास कर्जमाफी नाही !

महाराष्टात त्यांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. परिणामी मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे कर्जमाफी योजनेबाबत काही अडचणी आल्या. कर्जमाफीच्या अंतिम यादीत राहिली होती, त्यातील ज्या लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता या यादीतील लाभार्थी पात्र कर्जदारांना संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका व अन्य बँकांचे कर्ज आहे, त्या बँकांनी संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असे गृहीत धरावे.

आवश्य वाचा ः जयंत पाटील साधणार पाच लाख कार्यकर्त्यांशी संवाद 

त्यांना येणाऱ्या खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे. यात राज्य सहकारी बँकांच्या वतीने व काही बँकांनी स्वतःच्या निधीतून रक्कम उपलब्ध करून देणार आहेत. कर्ज खात्यात रक्कम व त्याचे व्याजाची रक्कम देण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. सुमारे अकरा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून आठ हजार कोटीच्या दरम्यान ही रक्कम आहे. त्यामुळे खरीपासाठी राज्यातील शेतकऱ्यांना निश्‍चितपणे दिलासा मिळेल.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख