The mountain of debt will remain on the heads of farmers, there is no debt waiver due to corona! | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर तसाच राहाणार, कोरोनामुळे तुर्तास कर्जमाफी नाही ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

एनपीए अकाऊंट झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज देण्याचे राज्य सरकारचे बॅंकांना आदेश आहेत.

मुंबई : करोनाच्या महासंकटामुळे राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटाबरोबरच कर्जाचा डोंगरही राहाणार आहे. 

राज्य सरकारकडे उपलब्ध असलेला निधी कोविड या आपत्तीसाठी वळवण्यात आल्याने कर्जमाफी शेतकऱ्यांना देणे आता शक्‍य नाही. मात्र एनपीए अकाऊंट झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज देण्याचे राज्य सरकारचे बॅंकांना आदेश आहेत.

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे आले नाहीत अशा खात्यांच्या पुढे शासनाकडून थकबाकी येणे असल्याचं बॅंकांनी लिहावं असे आवाहनही सरकारतर्फे राज्यातील बॅंकाना करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आले आहेत. कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी प्रतिष्ठेचा केला होता. राज्यात भाजपला सोडून त्यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आणि सत्तेवर येताच काही दिवसातच शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. तशी पहिली यादीही सरकारने जाहीर केली होती. 

उद्धव मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्जमाफीवरून तत्कालिन भाजप सरकारला जोरदार फटकारे लागवत होते. अनेकवेळा स्वत: उद्धव शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले.इतकेच नव्हे तर त्यांच्या कथा आणि व्यथाही जाणून घेतल्या. आपले सरकार सत्तेवर आले

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम निश्‍चित करू असे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. सत्तेवर येताच त्यांनी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. 

मात्र गेल्या मार्चमध्ये महाराष्ट्रासह देशावरच संकट आले. लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनामुळे सर्व व्यवसहा ठप्प झाले .राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हटले होते.

पहिल्या यादीनंतर लगेच दुसरी यादीही जाहीर करण्यात येणार होती. पण, मध्येच दुसरेच संकट राज्यावर आले आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे आता अशक्‍य होऊन बसले आहे. 

सत्तेवर आल्यानंतर म्हणजे गेल्या हिवाळी अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. आतापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे.

कर्जमुक्ती योजनेचे काम व्यवस्थित सुरू होते. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होणार होती. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सुरुवात झाली होती. फडणवीस सरकारमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता अशांसह सर्वच शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार होते. 

कोरोनामुळे सरकारचेही हात आता बांधले गेल्याने तुर्तास तरी शेकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. आता सरकार उर्वरित शेतकऱ्यांना कशी कर्गमाफी देणार हे ही महत्त्वाचे आहे.

शेवटी स्वत: उद्धव ठाकरेंनीच शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफ करणार असल्याचे जाहीर केले. मात्र जे ठाकरे सातबारा कोरा करा अशी मागणी करीत होते त्याचे काय झाले असा सवाल तर विरोधीपक्ष करीत आला आहे. सातबारा कोरा केला नसला तरी दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख