जयंत पाटील साधणार पाच लाख कार्यकर्त्यांशी संवाद - Minister Jayant Patil Interact With 5 Lakh NCP Members In State | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटील साधणार पाच लाख कार्यकर्त्यांशी संवाद

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 मे 2020

लोकांपर्यंत मदत पोहचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानांतर्गत जाणून घेणार आहेत. या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जूनला २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' अभियानाची घोषणा केली आहे. यामध्ये ते राज्यभरातील जवळपास पाच लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधणार आहेत. यातून मिळणारी इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोचविणार आहेत.

. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम करत आहेत. काही
दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल, तसेच राज्य पूर्वपदावर येईल. तेव्हा काही समस्या उद्भवतील. या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील. लोकांपर्यंत मदत पोहचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या
अभियानांतर्गत जाणून घेणार आहेत. या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

 राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन जवळपास सहा महिने पूर्ण झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम करत आहेत. काही दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल, तसेच राज्य पूर्वपदावर येईल. तेव्हा काही समस्या उद्भवतील. या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील.

लोकांपर्यंत मदत पोहचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानांतर्गत जाणून घेणार आहेत. या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. काल (शुक्रवार) पासून या अभियानाची सुरवात झाली असून महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील पाच लाखांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच बूथ कमिटी अध्यक्ष व सदस्य ,स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी व सदस्य, तालुकाध्यक्ष यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. यातून आलेल्या सूचनांच्या माध्यमातून पक्ष यंत्रणा मजबूत करण्यासोबतच महाराष्ट्रातील जनतेची सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख