दर्यापूरच्या श्‍वेताची बहादुरी, अफगाणिस्तानातून 129 भारतीयांना सुखरूप आणले मायदेशी...

अफगाणिस्तानामधील स्फोटक स्थिती बघता आपल्या जिवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करणे, या एकमेव ध्येयातून सर्व टीम कामी लागली होती.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

दर्यापूर (जि. अमरावती) : आपला जीव वाचवत अफगाणिस्तानमधून From Afghanistan बाहेर पडण्यासाठी लोक जिवाची बाजी लावत आहेत. विमानात जागा मिळाली नाही म्हणून विमानाच्या पंख्यावर लटकून देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात उडत्या विमानातून लोक खाली पडताना जगाने पाहिले. अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर येथील मुलीने अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना देशात सुरक्षित आणले. Daryapurs shweta brought 129 indians back safely from afghanistan श्वेता चंद्रकांत शंके, असे या मुलीचे नाव...

अफगाणिस्तानमधून भारतीयांना आपल्या देशात सुखरूप आणण्यासाठी इंडियन एअर लाइन्सने पाठविलेल्या विमानात आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्यांमध्ये दर्यापूरमधील श्‍वेताचा सहभाग आहे. श्वेता हवाई सुंदरी आहे. ती दर्यापूरमधील बाभळी येथे शिवाजी चौकात राहते. तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. बहीण दर्यापूरमध्ये दंतरोग तज्ज्ञ आहे. भाऊ फार्मासिस्ट आहे. अफगाणिस्तानात जी परिस्थिती उद्भवली, त्याचे चित्रण दूरचित्रवाहिन्यांवर बघून भल्याभल्यांची घाबरगुंडी उडाली. पण एआय 244 या विमानाने काबूल विमानतळावर अतिशय बिकट परिस्थिती असतानासुद्धा उड्डाण घेतले आणि दिला आपल्या शुरविरतेचा परिचय.

2017-18 मध्ये श्‍वेताची निवड हवाई सुंदरीकरिता झाली. प्राथमिक प्रशिक्षण संपल्यावर इंडियन एअरलाइनमध्ये ती कार्यरत झाली, सध्या ती दिल्ली येथे तैनात आहे. अफगाणिस्तानात सध्या निर्माण झालेल्या गंभीर स्थितीनंतर तेथील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अफगाणिस्तानात अडकलेल्या 129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे एक विशेष विमान अफगाणिस्तानातून आज भारतात यशस्वीपणे दाखल झाले. एआय 244 या विमानाने काबूल विमानतळावर अतिशय बिकट परिस्थिती असतानासुद्धा उड्डाण घेतले. 

या विमानात दर्यापूरची हवाई सुंदरी श्वेता शंके ही सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळली. अफगाणिस्तानामधील स्फोटक स्थिती बघता आपल्या जिवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करणे, या एकमेव ध्येयातून सर्व टीम कामी लागली होती. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रसंगी प्राण गेले तरी चालेल, ही ऊर्मी बाळगत कार्य करण्यात आले. या मिशनमध्ये सुमारे 129 भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी यश आले. यात सहभागी असणाऱ्या श्वेता शंके या हवाई सुंदरीचे व तिच्या परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्‍वेतासह पूर्ण टीमची बहादुरी अनेकांना प्रेरणा देऊन गेली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com