स्‍वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताची पताका जगावर फडकावी…

चंद्रपूर येथील सैनिक शाळेत मुलींना प्रवेश मिळावा यासाठी तत्‍कालीन संरक्षण मंत्री निर्मल सितारामन यांना भेटलो असता त्‍यांनी ती मागणी तत्‍काळ पूर्ण केली व मागील वर्षीपासून चंद्रपूर येथील सैनिक शाळेमध्‍ये मुलींना प्रवेश देण्‍यास सुरुवात झाली.
स्‍वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताची पताका जगावर फडकावी…
Sudhir Mungantiwar

नागपूर : २०४७ मध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. त्‍यावेळी भारताची पताका संपूर्ण जगात फडकावी, When hundred years of indipendence are completed the flag of india should be hoisted  असे आपले सर्वांचे प्रयत्‍न असले पाहिजे. यासाठी शारीरिक व मानसिक दृष्‍टया सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्‍यक आहे. आज चंद्रपूर जिल्ह्याच्या मूलमध्ये पै. खाशाबा जाधव जीमचे उद्घाटन झाले. यामुळे समर्थ भारत घडविण्‍यासाठी सुदृढ युवक व युवती तयार होतील, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

उद्घाटन कार्यक्रमाला मंचावर जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, न.प. अध्‍यक्ष रत्‍नमाला भोयर, न.प. उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, पं.स. सभापती चंदू मारगोनवार, मुल शहर भाजपाध्‍यक्ष प्रभाकर भोयर यांची उपस्थिती होती. आमदार मुनगंटीवार म्‍हणाले, मिशन शक्‍ती अंतर्गत आपल्‍या जिल्ह्यातील खेळाडू ऑलिम्‍पीकपर्यंत पोहोचावे व त्‍यांनी विविध खेळांमध्‍ये पदके जिंकावी या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर येथे शहीद बाबूराव शेडमाके यांच्‍या नावाने स्‍टेडियम तयार होत आहे. तसेच चंद्रपूरच्‍या जिल्‍हा स्‍टेडियमसाठी सुध्‍दा भरीव निधी दिला. त्‍या व्‍यतिरिक्‍त बल्‍लारपूर तालुक्‍यात विसापूर येथे आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे स्‍टेडियम अंदाजे ३० कोटी रुपये खर्च करून बांधण्‍यात आले आहे. याठिकाणी आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या सुविधा सर्व खेळांसाठी उपलब्‍ध आहेत. 

पोंभुर्णा व मुल येथेही अत्‍याधुनिक स्‍टेडियमची निर्मिती करण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे अत्‍याधुनिक जीमची निर्मिती करण्‍यात आली असून यामुळे त्‍या विभागातील युवक युवतींना त्‍याचा फायदा झाला आहे. त्‍याचप्रमाणे चंद्रपूर पोलिस विभागासाठी एका अत्‍याधुनिक जीमची निर्मिती करण्‍यात आली असून त्‍याचा उपयोग पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. या सर्व ठिकाणी युवक व युवतींचे निरनिराळ्या खेळांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. ज्‍यामुळे त्‍या त्‍या भागांतील युवक युवतींचा उत्‍साह वाढण्‍यास मदत झाली आहे. 

आज ज्‍या जीमचे लोकार्पण करीत आहे ती पै. खाशाबा जाधव यांच्‍या नावाने बांधली याचा अतिशय आनंद होत आहे. आजपर्यंत ब-याच प्रकल्‍पांना राजकीय नेत्‍यांची नावे दिली जात होती. परंतु या निमीत्‍याने आपल्‍या देशातील खेळाडूंच्‍या सन्‍मान होतो आहे, ही आनंदाची गोष्‍ट आहे. दुसरी महत्‍वाची गोष्‍ट अशी की ही जीम एकाचवेळी पुरुष व महिला यांच्‍यासाठी उपयोगात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्‍ट रोजी लाल किल्‍ल्‍यावरून केलेल्‍या भाषणात घोषणा केली होती की, यापुढे मुलींना सैनिक शाळेमध्‍ये प्रवेश देण्‍यात यावा. चंद्रपूर येथील सैनिक शाळेत मुलींना प्रवेश मिळावा यासाठी तत्‍कालीन संरक्षण मंत्री निर्मल सितारामन यांना भेटलो असता त्‍यांनी ती मागणी तत्‍काळ पूर्ण केली व मागील वर्षीपासून चंद्रपूर येथील सैनिक शाळेमध्‍ये मुलींना प्रवेश देण्‍यास सुरुवात झाली, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.

सहा वर्षापूर्वीचे मुल व आजचे मुल यात प्रचंड फरक झालेला आहे. रस्‍ते, शासकीय इमारती, चौकांचे सौंदर्यीकरण, मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण, बस स्टॅण्ड, पाणी पुरवठा योजना, विद्युत योजनेचे नविनीकरण या व अशा अनेक योजना कार्यान्वित करण्‍याचा प्रयत्‍न केला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नगरसेवक प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, महेंद्र करकाडे, शांताबाई मांदाडे, प्रशांत लाडवे, मिलींद खोब्रागडे, वनमाला कोडापे, विद्या बोबाटे, रेखा येरणे, आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, संगिता वाळके, वंदना वाकडे, विनोद सिडाम, प्रभा चौथाले, मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणमान्‍य नागरिक बंधू, भगिनी उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in