भाजप,राष्ट्रवादीच्या सहाजणांची राजकारणापालिकडची अतूट मैत्री...

२००७ ला हे सहाही जण नगरसेवक होते. त्यावेळी एकाच पक्षात असूनही ते वेगवेगळ्या नेत्यांना मानत होते. तरीही त्या पूर्ण टर्ममध्ये म्हणजे २०१७ ते २०१२ या कालावधीत आम्ही मोठी धमाल केली, असे शितोळे यांनी सांगितले.
BJP, NCP's six members An inseparable friendship between politicians
BJP, NCP's six members An inseparable friendship between politicians

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातून विस्तव जात नाही, अशी सध्या स्थिती आहे. इकडे पिंपरी-चिंचवडमध्ये, मात्र या दोन्ही पक्षांच्या सहा पदाधिकाऱ्यांत राजकारणापालिकडची मैत्री गेली कित्येक वर्षे टिकून आहे. दरवर्षी ते मैत्रीदिनी एकाच ठिकाणी एकाच वेळेत एकत्र जमून चहा पार्टी करतात. तशी कालही ही 'टी पार्टी' झाली. मात्र, राजकीय चर्चा आवर्जून टाळण्याचे अलिखीत नियम ते दरवेळी पाळतात. BJP, NCP's six members An inseparable friendship between politicians

'फ्रेंडसशिप डे' शिवाय इतर वेळीही हे सहाजण लग्न, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यानिमित्तही एकत्र येत असतात. वेळ असेल, तर कुटुंबासह ही भेटतात. दोन महिन्य़ापूर्वी महेशदादांची कन्या साक्षी हिचे लग्न झाले. त्यावेळी ही मित्रांची टोळी खरेदीसाठी एकत्र आली होती.लग्नानंतर त्यानी लोणावळा येथे मस्त एन्जॉय करीत ग्रुप डान्सही केला. किमान मैत्रीदिनी, तरी त्यांच्या या मैत्रीची पुन्हा एकवार चर्चा शहरात होते.

या सहामध्ये भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजपचे प्रदेश सदस्य व पक्षाच्या दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश निमंत्रक राजू पिल्ले, माजी नगरसेवक बापू तथा शांताराम भालेकर, राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोथी पक्षनेते राजू मिसाळ, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आणि माजी कार्याध्यक्ष उल्हास शेट्टी यांचा समावेश आहे.

पिल्ले हे सर्वांत ज्येष्ठ असले, तरी ते ब्रेक डान्सर असल्याने ते सगळ्यात चांगला डान्स करतात. पूर्वी ते सर्व राष्ट्रवादीतच होते. २०१४ व २०१९ मध्ये तिघे भाजपमध्ये गेले. तरीही त्यांच्यातील मैत्री तुटली नाही व उलट ती वाढली. पैलवान आमदार सहसा चहा पित नाहीत. मात्र, काल त्यांनी आवर्जून मित्रांसोबत तो घेतला. २५ वर्षापासून आम्ही राजकारणापालिकडील ही मैत्री जपल्याचे त्यांनी सरकारनामाला आवर्जून सांगितले.

कालच्या भेटीतही राजकारण सोडून बाकी सर्व विषयावर चर्चा झाली, असे ते म्हणाले. २००७ ला हे सहाही जण नगरसेवक होते. त्यावेळी एकाच पक्षात असूनही ते वेगवेगळ्या नेत्यांना मानत होते. तरीही त्या पूर्ण टर्ममध्ये म्हणजे २०१७ ते २०१२ या कालावधीत आम्ही मोठी धमाल केली, असे शितोळे यांनी सांगितले.

पक्ष वेगवेगळे असले, तरी आताही वरचेवर आम्ही भेटत असतो, असे ते म्हणाले. शहरातील भाजपचे दुसरे आमदार व माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि याच पक्षाचे ज्येष्ठ नेते व भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे-पाटील यांच्या राजकारणापलिकडील शहरातील मैत्रीचा वारसा हे सहाजण पुढे चालवित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com