अदानींना शिवसेनेचा दणका ; नामफलकाची तोडफोड

संजय राऊत यांनी देखील या फलकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या फलकाची आज शिवसैनिकांची तोडफोड केली.
 अदानींना शिवसेनेचा दणका ; नामफलकाची तोडफोड
Sarkarnama Banner - 2021-08-02T152045.242.jpg

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या Mumbai Airport व्यवस्थापनाचा ताबा ता. १३ जुलैला अदानीं उद्योगसमुहाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर आणि परिसरात 'अदानी विमानतळ' असे नामफलक लावण्यात आले आहेत. ''छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्राय विमानतळ' असे नाव असणाऱ्या या विमानतळ परिसरात अदानीं ग्रुपकडून ''अदानी विमानतळ'' असे नामफलक लावण्यात आले आहे, यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली आहे.   

''अदानी एअरपोर्ट'' Adani Airport असे नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेसह सोशल मीडियाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या फलकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या फलकाची आज शिवसैनिकांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात सध्या पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.  

E-RUPI : स्मार्टफोन, इंटरनेटशिवाय एसएमएसने पैसे ट्रान्सफर करा!  
''विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असून अदानीने आपलं नाव देऊ नये,'' अशी मागणी शिवसेने आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह GVK आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाकडे आले आहे. ''अदानी विमानतळ'' असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत. जीव्हीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अदानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे.  

 मुंबई : शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज 'सामना'च्या अग्रलेखातून आज भाजपच्या नेत्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अग्रलेखातून भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्याला भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ''शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी,'' असं म्हणत राणेंनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांच्यावर अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.  
 Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.