मोठी बातमी : दुकानांच्या वेळा आता रात्री 8 पर्यंत, मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

राज्यातील दुकांनांच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मोठी बातमी : दुकानांच्या वेळा आता रात्री 8 पर्यंत, मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
uddhav thackeray says shops will be open till 8pm in state

सांगली : राज्यातील दुकांनांच्या वेळा (Shop timings) रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. रुग्ण वाढ कमी होत नाही त्या ठिकाणी दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील तर इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगली येथे पूर परिस्थितीची आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सहाही जिल्हे पूर परिस्थितीपूर्वी कोरोनाशी लढताहेत. सांगली परिसरात चाचण्या वाढावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. माझ्या दृष्टीने नागरिकांचे जीव वाचविणे महत्वाचे आहे. राज्यात आज 1 हजार 250 ते 1 हजार 300 टन ऑक्सिजनचे दररोज उत्पादन होते. तरीही मध्यंतरी ऑक्सिजनचा तुटवडा झाला होता. पुढच्या कोरोना लाटेबद्दल केंद्रानेही निर्देश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. 

मला सर्वांना विनंती करायची आहे की प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालावा. रुग्ण वाढ कमी होत नाही त्या ठिकाणी दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवणार आहोत. लोकलच्या बाबतीत लगेच निर्णय घेण्यात येणार नाही. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळांची  विभागणी करावी. याचबरोबर वर्क फ्रॉम होमचे नियोजन करावे. उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबल करणे आणि आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.