कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, तुम्हीही घेत जाऊ नका…

१३ डिसेंबर २०१९ ला हे केलं असतं तर आरक्षण गेलंच नसतं. सरकारला जे तेव्हा सुचायला पाहिजे होतं, ते उशिरा सुचलं. पण सरकारचा हा निर्णय योग्य आहे. मात्र यानंतरही पोटनिवडणुका होत असलेल्या पाच जिल्ह्यांत ओबीसींची एकही जागा राहणार नाही.
कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, तुम्हीही घेत जाऊ नका…
Devendra Fadanvis - Rahul Gandhi.

नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी Congress Leader Rahul Gandhi यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत Mohan Bhagwat यांच्यावर जोरदार टिका केली. यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांना आज विचारले असता, राहुल गांधी हे कपोलकल्पित आरोप करत असतात. आम्ही त्यांना मी गांभीर्याने घेत नाही, तुम्ही ही त्यांना गांभीर्याने घेत जाऊ नका, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या विधानाकडे दुर्लक्ष केले. 

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात पेटला आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने अध्यादेश काढल्याने दोन टेस्ट पूर्ण होतील, पण एक टेस्ट यानंतरही शिल्लक राहणार आहे. त्यासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अंतरिम अहवाल तयार करून घेतला पाहिजे मग तिसरी टेस्ट पूर्ण होईल आणि मग ओबीसी आरक्षणाला कुणीही न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही. सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं, पण उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले म्हणायचे, असा टोलाही त्यांनी हाणला. 

१३ डिसेंबर २०१९ ला हे केलं असतं तर आरक्षण गेलंच नसतं. सरकारला जे तेव्हा सुचायला पाहिजे होतं, ते उशिरा सुचलं. पण सरकारचा हा निर्णय योग्य आहे. मात्र यानंतरही पोटनिवडणुका होत असलेल्या पाच जिल्ह्यांत ओबीसींची एकही जागा राहणार नाही, इतर तीन - चार जिल्ह्यांत समस्या येतील, त्या मात्र सोडवाव्या लागतील. भविष्यात कशा प्रकारे आरक्षण टिकवता येईल, याचा विचार केला पाहिजे, असे सांगत हे प्रश्न नेहमीसाठी सोडवायचे असतील तर राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल घेऊन सर्वोच्च न्यायालयाची ट्रिपल टेस्टची अट पूर्ण केली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. 

काय म्हणाले होते राहुल गांधी ?
महात्मा गांधी यांचं एखादं छायाचित्र पाहिल्यानंतर त्यात त्यांच्याभोवती २-३ महिला दिसतात. पण भागवत यांचं महिलांसोबतच एखादं छायाचित्र पाहिलं आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवीन बोधचिन्हाचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आरएसएसनं महिलांना बाजूला केलं तर आम्ही महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिलं. मोदी-आरएसएस महिला पंतप्रधान करणार नाहीत, पण काँग्रेसनं केलं, असं राहुल यांनी सांगितलं.

आज देशात आरएसएस व भाजपचं सरकार आहे. त्यांच्या आणि आपल्या विचारधारेत फरक आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्यानं मी इतर कोणत्याही विचारधारेशी जुळवून घेऊ शकतो पण त्यांच्या विचारधारेशी कधीच समझोता करू शकत नाही. काँग्रेसची विचारधारा महात्मा गांधींची विचारधारा आहे. तर भाजप-आरएसएसची विचारधारा गोडसे आणि सावरकर यांची विचारधारा आहे, असं राहुल म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in