नेत्यांनी चळवळींचा वापर केवळ मतांसाठी केला, काळ प्रत्येकाचा येतो, हिशोब चुकता करू

आम्हीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कुठे ना कुठे असणार आहोत. त्यावेळी या सर्वांचे हिशोब चुकते करू, असा सणसणीत इशारा रविकांत तुपकर यांनी कुण्या एका नेत्याचे नाव न घेता दिला.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar

नागपूर : सन २०१९ मध्ये जेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत Congress and NCP युती झाली. त्यावेळी लोकसभेच्या दोन आणि एक विधानपरिषदेची जागा देण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार NCP Leader Sharad Pawar यांनी सांगितले होते की, तुम्हाला कॉंग्रेसकडून आम्ही सांगली किंवा वर्धेची एक जागा देतो आणि एक विधानपरिषदेची जागा देतो. दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. राजकीय नेते चळवळींचा वापर केवळ मतांसाठी करतात. पण त्यांनी लक्षात ठेवावे की, काळ प्रत्येकाचा येतो, आम्ही हिशोब चुकता करू, असे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर म्हणाले. Ravikant Tupkar 

रविकांत तुपकर म्हणाले, आम्ही हातकणंगले आणि बुलडाण्यासाठी प्रचंड आग्रही होतो. पण बुलडाण्याच्या जागेवरून आमचा टाय आला. त्यावेळी शरद पवारांनी सांगितले होते की, तुम्हाला कॉंग्रेसकडून आम्ही सांगली किंवा वर्धेची एक जागा देतो आणि एक विधानपरिषदेची जागा देतो. ठरल्याप्रमाणे सांगली आणि हातकणंगलेची जागा आम्ही लढलो. विधानपरिषद मिळण्याची कमिटमेंट त्यावेळी झाली होती. पण दिलेला शब्द राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाळला नाही आणि आम्हाला आत्ता माध्यमांकडूनच कळले की, आमचे नेते राजू शेट्टी यांचे नाव राज्यपाल नियुक्त यादीमधून वगळले.

राजू शेट्टी यांच्यासारखा माणूस त्या सभागृहात का नको? खरे तर त्यांच्यासारखा लढणारा, अन्यायाला वाचा फोडणारा माणूस सभागृहात असणे फार गरजेचे होते. परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांना चळवळीतले नेते आणि कार्यकर्ते चालत नसतात. चळवळीचा वापर राजकारणासाठी आणि मते घेण्यासाठी पाहिजे, पण जेव्हा चळवळीतल्या नेत्यांना काही द्यायची वेळ येते तेव्हा सगळ्याच प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या पोटात दुखतं. चळवळींचा वापर नेत्यांनी केवळ मते मिळविण्यासाठी केला आहे. यावेळी त्याची प्रचिती पुन्हा एकवार आलेली आहे, असे तुपकर म्हणाले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम आहे. शेतकऱ्यांचा या संघटनेवर विश्‍वास आहे. आज जरी राजू शेट्टी यांना आमदारकी दिलेली नसली, तरी काही हरकत नाही. कारण आमदारकी आणि खासदारकीसाठी आम्ही जन्माला आलेलो नाही. शेतकऱ्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला तसाच आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. आमदारकी आणि खासदारकी असली काय अन् नसली काय, याचा फारसा फरक आम्हाला पडणार नाही. आम्ही कायम अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात भांडत असतो. 

पण यावेळी या निमित्ताने आम्हाला सर्व प्रस्थापित पक्षांना सांगायचे आहे की, ज्या पद्धतीने चळवळीला नख लावण्याचा प्रयत्न या आमदारकीच्या निमित्ताने झाला. काळ प्रत्येकाचा येत असतो. राजकीय जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये कमी जास्त होत असते. चढउतार येत असतात. आम्हीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कुठे ना कुठे असणार आहोत. त्यावेळी या सर्वांचे हिशोब चुकते करू, असा सणसणीत इशारा रविकांत तुपकर यांनी कुण्या एका नेत्याचे नाव न घेता दिला. सध्या ही बाब माधम्यांमधूनच पुढे आली आहे. पण जर खरंच राजू शेट्टी यांचे नाव प्रस्तावित विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीतून वगळले असेल, तर स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा बघायला मिळू शकतो.....!
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com