राजू शेट्टी भडकले; दिला राष्ट्रवादीला हा इशारा...

राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी भडकले; दिला राष्ट्रवादीला हा इशारा...
Raju Shetty erupted; This warning was given to the NCP

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, त्यामुळे करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. Raju Shetty erupted; This warning was given to the NCP

माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिलं आहे. दरम्यान राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

यासंदर्भात ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा एक समझौता झालेला होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असं माझे म्हणणं नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन, असा इशारा त्यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर तेथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात विचारले असता श्री. शेट्टी म्हणाले, मी विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेत नाही. २३ ऑगस्टलाच मी शासनाने महापुरात झालेल्या पिकांच्या नुकसानावर काढलेलं कर्ज माफ करावं, अशी मागणी सरकारकडे केली होती. पूराला आता दीड महिना झाला असून नव्या पिकासाठी पैशांची गरज आहे.

जुनं कर्ज माफ झाल्याशिवाय नवं कर्ज मिळणार नाही. त्यानुसार शेतीचं नियोजन करता येईल. आम्हाला ठोस निर्णयाची अपेक्षा असून केंद्राप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलं तर महागात पडेल, असा इशारा श्री. शेट्टींनी दिला. इतक्या उन्हात लोक आमच्यासोबत चालत आहेत ते वेडे आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in