घोटाळेबाजाला घोटाळाच दिसेन ना, नाना पटोलेंचा खासदार मेंढेंना टोला…

प्रवीण दरेकर वायफळ बोलतात त्यांच्या वक्तव्य करणे चुकीचे ठरेल असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. नाना पटोले राजकारणाचे कावीळ असल्याच्या प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी चांगला समाचार घेतला आहे.
Nana Patole - Sunil Mendhe
Nana Patole - Sunil Mendhe

भंडारा : सीबीआय चौकशी झाल्यावर महाविकास आघाडीचा धान घोटाला बाहेर निघेल. कारण राज्य सरकारने भंडारा गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीत २०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप खासदार सुनील मेंढे MP Sunil Mendhe यांनी गुरुवारी केला होता. त्यावर पटोले State President of Congress Nana Patole यांनी खासदार सुनील मेंढे यांना चिमटे काढले. घोटाळेबाजाला घोटाळाच दिसेल ना, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता खासदार सुनील मेंढे यांना टोला लगावला. मात्र या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. 

४५० कोटी रुपये खर्च करून होणार ओबीसी जनगणना
४५० कोटी रुपये खर्च करून ओबीसी जनगणना होणार असल्याचे वक्तत्व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले असून राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर असल्याने मागासवर्गीय आयोगाच्या मागणीनुसार ओबीसी जनगणनेसाठी 450 कोटी रुपये देण्यास महाविकास आघाडीचे सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज ते आपल्या भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान गृह तालुका साकोली येथे आल्यावर बोलत होते. यावेळी इम्पिरिकल डाटा तयार करून ओबीसी आरक्षण देउनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रातील मोदी सरकार ओबीसी जनगणनेस विरोध करत असल्याच्या आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. 

बावनकुळे यांचा अभ्यास कमजोर...
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अभ्यास कमी असल्याच्या टोला नाना पटोले यांनी लगावला असून उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आरक्षण देऊन महाविकास आघाडी ओबीसीच्या जागेवर डल्ला मारीत असल्याच्या आरोपावर नाना पटोले यांनी हे उत्तर दिले. काँग्रेस संपूर्ण उत्तर प्रदेशातील लोकांना आरक्षण देण्याबाबत बोलत नसून जे उत्तर भारतीय महाराष्ट्रात जन्मलेले आहेत आणि ५० वर्षांपासून महाराष्ट्रात राहणाऱ्या  त्यात लोकांना आरक्षण लागू करण्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याचे पटोले म्हणाले भाजपच्या लोकांना संविधान माहीत नसल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.

प्रवीण दरेकर वायफळ बडबड करतात...
प्रवीण दरेकर वायफळ बोलतात त्यांच्या बद्दल बोलणे करणे चुकीचे ठरेल, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. नाना पटोले राजकारणाचे कावीळ असल्याच्या प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी चांगला समाचार घेतला आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com