माजी सरन्यायाधीशांना बघायची होती जुनी वास्तू, मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या...

संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या महाल स्थित घराचे जतन करण्यात आले आहे. १९८९ मध्ये हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्रीनिवास वर्णेकर यांनी या घराच्या जतनाचे काम केले.
Sarkarnama
Sarkarnama

नागपूर : निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे Former chief justice Sharad Bobde यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार Dr Keshav Baliram Hedgewar यांच्या निवासस्थानी काल भेट दिली. निवृत्त सरन्यायाधीश येणार असल्याची माहिती मिळताच, सुरक्षा यंत्रणेने कडक बंदोबस्त लावला. त्यांना जुनी वास्तू बघायची होती, असे सांगण्यात येत असले तरीही त्यांचा या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. Many raised eyebrows. 

या दरम्यान त्यांनी माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चाही केली. अनेकांना या भेटीची उत्सुकता लागून राहिली होती. जुन्या काळातील वास्तू, निवास बघण्यासाठी शरद बोबडे संघ मुख्यालयात गेले होते असा दावा केला जात आहे. जुने बांधकाम कसे होते, कोणकोणत्या कलेचा वापर करण्यात आला, याबाबत त्यांना उत्सुकता असल्याचे सांगण्यात येते. निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासोबत त्यांचे वर्गमित्र हेमंत जांभेकर उपस्थित होते. निवृत्त सरन्यायाधीश येणार असल्याचे सुरक्षा यंत्रणांना संदेश मिळताच कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शरद बोबडे यांनी संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीची चांगलीच चर्चा शहरात होती. 

संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या महाल स्थित घराचे जतन करण्यात आले आहे. १९८९ मध्ये हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्रीनिवास वर्णेकर यांनी या घराच्या जतनाचे काम केले. त्यावेळी संघ पदाधिकारी असलेले मोहन भागवत यांच्या देखरेखीखाली जतन व नूतनीकरणाचे काम झाले. माजी सरन्यायाधीश बोबडे यांनाही त्यांच्या आकाशवाणी चौकातील वडिलोपार्जित राहत्या घराचे जतन करायचे असल्याने त्यांनी वर्णेकरांसह या घराला भेट दिल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली. 

या भेटीत काय चर्चा झाली, त्याची माहिती मिळू शकली नाही. पण केवळ जतन करण्यासाठी जुन्या वास्तू पाहण्यासाठी माजी सरन्यायाधीश आले होते, ही बाब कुणाच्याही पचनी पडली नाही. त्यामुळे जो तो आपआपल्या परीने या भेटीचे अर्थ काढत होता. त्यांच्यात सद्यःस्थितीतील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याचाही अंदाज काहींनी वर्तविला. पण अखेरपर्यंत त्याची पुष्टी होऊ शकली नाही.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com