तिसऱ्या लाटेची भिती दाखवून जनतेस रोखले जात आहे, भाजपचा राज्य सरकारवर निशाणा...

मनोज भिवगडेअकोला :कोरोनाच्या लसीकरणाचे दोन डोज देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरली आहे. केंद्र सरकारने मागणीपेक्षा अधिक डोस देऊनही सरकारने काम केले नाही. केवळ तिसऱ्या लाटेची भिती दाखवून जनतेला घराबाहेर पडण्यापासून रोखणे, येवढा एकच कार्यक्रम राबविला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केला आहे.
Randhir Sawarkar - Mahale - Patni
Randhir Sawarkar - Mahale - Patni

अकोला : कोरोनाच्या लसीकरणाचे दोन डोज देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरली आहे. केंद्र सरकारने मागणीपेक्षा अधिक डोस देऊनही सरकारने काम केले नाही. केवळ तिसऱ्या लाटेची भिती दाखवून जनतेला घराबाहेर पडण्यापासून रोखणे, People are being stopped by showing fear of third wave येवढा एकच कार्यक्रम राबविला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी BJP"s MLA's केला आहे. 

देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच आहे. लसीकरणाबाबतच्या धोरण लकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा, अशी मागणी भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार श्वेता महाले, वाशीम जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, अकोला महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, बुलडाणा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी बुधवारी एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भारतासारख्या गरीब देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून सुरू होता. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करून मोदी सरकारने या अपप्रचारास चोख चपराक लगावली आहे. याच वेगाने राज्यांनीदेखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी याकरिता लशीच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले. महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या. त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे असतानाही, राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना हात हालवत परतावे लागत आहे, तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे. ठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही. त्यामुळे जनतेचे हाल सुरूच आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

केवळ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून जनतेस घराबाहेर पडण्यापासून रोखणे एवढा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकार राबवत असल्याने महाराष्ट्र पुन्हा बेरोजगारी, मंदी आणि नैराश्याच्या सावटात ढकलला जात आहे. त्यातच, मोफत लसीकरण केंद्रांवर लस नाही आणि खाजगी केंद्रावर सशुल्क लसीकरण मात्र उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या मोहिमेविषयी संशय व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या नेत्यांनी केला आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com