महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

काकूशी फोनवरून संवाद साधताना अनिलने माझ्या भावाची बायको गर्भवती असून मृत्यूनंतर मी तिच्यापोटी जन्म घेईन, अशी इच्छा व्यक्त केली. हा ऑडीओसुद्धा व्हायरल झाला आहे.
Sarkarnama
Sarkarnama

नागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस नगरपालिकेतील एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने शिवसेनेची महिला पदाधिकारी ब्लॅकमेल Shiv Sena's Lady Office Bearers करीत असल्याने तिच्या जाचाला कंटाळून काल रात्री आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात मृत्यूनंतर न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. यात संजय राठोड साहेब Sanjay Rathore Saheb असा उल्लेख आहे. ब्लॅकमेल करणारी महिला ही शिवसेनेची पदाधिकारी असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेला दिग्रस नगरपालिकेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल अशोक उबाळे याने विष घेत असल्याचे फोनवर काकूला सांगितले असून विष घेतल्याची माहिती सर्वप्रथम आईला दिली होती. हे दोन्ही ऑडिओसुद्धा समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून अनिल उबाळे यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या  व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागणीकरिता अनिलच्या नातेवाइकांसह नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला आहे. 

अद्याप गुन्हा दाखल व्हायचा आहे. सदर ब्लॅकमेल करणारी महिला ही शिवसेनेची दिग्रस येथील उपशहरप्रमुख असल्याचे अनिलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तिच्या नावाचा उल्लेख करीत ती संजय राठोड साहेब यांचा धाक दाखवीत गेल्या सात वर्षांपासून ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हटले आहे. तिच्या जाचामुळे आपले जीवन उद्ध्वस्त झाल्याने आत्महत्या करीत असल्याचेही त्यांनी व्हिडिओत सांगितले आहे. तसेच सदर महिलेने पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. आपण दोन लाख रुपयांची जुळवाजुळव केली असून तीन लाख रुपये आता देऊ शकत नसल्याचेही अनिल सांगत आहे. त्यामुळे आत्महत्या करीत असून मला माझ्या मित्र मंडळी व नातेवाइकांनी मृत्यूनंतर न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही केली आहे. 

काकू व आईशी साधला संवाद..
अनिलने सर्वात आधी काकूला फोन करून त्या महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची माहिती फोनवरून दिली. त्यात काकूने घरी येतो आपण बोलू, आत्महत्या करू नकोस अशी गळ घातली. तर आपण विष घेतल्याची माहिती त्यांनी सर्वप्रथम आईला दिली, हे ऐकून आईने त्याला असे करू नकोस असे म्हटले. त्याने आईला न्याय मिळवून दे, अशी विनंतीही केली.

भावाच्या बायकोच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा..
काकूशी फोनवरून संवाद साधताना अनिलने माझ्या भावाची बायको गर्भवती असून मृत्यूनंतर मी तिच्यापोटी जन्म घेईन, अशी इच्छा व्यक्त केली. हा ऑडीओसुद्धा व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com