...तर मी महाराष्ट्र सोडून जाईन, नाही तर भावना गवळीने राजीनामा द्यावा !

भावना गवळी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांसमोर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यातून, राज्यातीलच नव्हे तर देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिशाभूल केल्याची बाब जाणवली.
Bhawana Gawali - Harish Sarda.
Bhawana Gawali - Harish Sarda.

नागपूर : सन २०२१ पूर्वी माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. जेव्हा मी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी MP of yavatmal - washim Bhavna Gawali यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. २०२१च्या आधी माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल असतील तर दाखवा. असतील तर मी महाराष्ट्र सोडून जाईल आणि नसतील तर भावना गवळीने राजीनामा द्यावा, असे आव्हान शिवसेनेचे हरीष सारडा Shiv sena's Harish Sarda यांनी गवळींना दिले आहे. 

खासदार भावना गवळी यांचा एकेरी उल्लेख करीत सारडा यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. वाशीमचे पोलिस प्रशासनही ‘तिच्या’ दबावाखाली आहे. माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. उलट माझ्यावरच गुन्हे दाखल केले जातात. गवळी आणि पोलिसांच्या दहशतीमुळे गेले ३ महिने झाले मी माझ्या घरी जाऊ शकलेलो नाही. मी घरी असताना आणि आता नसतानाही गवळीचे गुंड माझ्या घरी येतात. घाणेरडी शिवीगाळ करतात, जीवे मारण्याची धमकी देतात. पण पोलिस माझी तक्रार घेत नाहीत. त्यामुळे मला जीव वाचवते फिरावे लागत आहे, अशी कैफियत सारडा यांनी मांडली. 

...तर तीच जबाबदार !
मी भावना गवळीची तक्रार केल्यानंतर सतत मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. २ वेळा माझ्यावर जीवघेणा हल्लासुद्धा झाला आहे. आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर जर माझा खून झाला, तर त्यासाठी भावना गवळीला जबाबदार धरण्यात यावे. कारण बलात्कार, दरोडे आणि खुनाचे गुन्हे दाखल असलेले गुंड माझ्या घरी येऊन सतत धमक्या देत आहेत. सीसी टीव्हीमध्ये ते कॅप्चर झाले आहेत. पोलिसांना पुराव्यांसह तक्रार दिली आहे. पण त्यांच्यावर कारवाई न करता सर्व यंत्रणा माझ्या जिवाच्या मागे लागली असल्याचाही आरोप सारडा यांनी केला आहे. 

शरद पवारांनी दिली चुकीची माहिती...
श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना, रिसोड (जि. वाशीम) या प्रकरणात खासदार भावना गवळी आता अडचणीत सापडल्या आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी भेट घेत त्यांना चुकीची माहिती दिली. यामुळे, शरद पवार यांची दिशाभूल त्यांनी केली. त्यामुळे गवळीने आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. 

भावना गवळी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांसमोर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यातून, राज्यातीलच नव्हे तर देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिशाभूल केल्याची बाब जाणवली. तपास यंत्रणांबाबतचे हे वक्तव्य चुकीचे आणि संभ्रम पसरविणारे आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या बचावासाठी भावना गवळी यांनी त्यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे, भावना गवळी यांनी शरद पवार आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. या कारखाना घोटाळा प्रकरणावर नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने या प्रकरणांवर प्रशासनाला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणीच्या वेळी मी या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याबाबत न्यायालयाला माहिती देणार आहे, असेही सारडा यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com