खासदारपूत्र म्हणतात, मला एक वर्षापूर्वी संपत्तीतून बेदखल केलं...

माझा मुलगा पंकज तडसने सहा महिन्यांपूर्वी मला न सांगता पूजाशी लग्न केलं होतं. तेव्हापासूनच तो वेगळा वर्धेला आणि मी व माझी पत्नी, आम्ही देवळीला राहतो आहे. त्याचा संसार वेगळा आहे.
खासदारपूत्र म्हणतात, मला एक वर्षापूर्वी संपत्तीतून बेदखल केलं...
Sarkarnama (

नागपूर : भाजपचे खासदार रामदास तडस BJP's MP Ramdas Tadas यांच्या सुनेने त्यांचा मुलगा पंकजच्या His Son Pankaj विरोधात अत्याचाराचे गंभीर आरोप करीत पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल गेली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. काल खासदार तडस यांनी पंकज आणि पूजा Pooja यांचा विवाह वैदिक पद्धतीने लावून दिला. दरम्यान मला एक वर्षापूर्वी संपत्तीतून बेदखल केल्याची बाब पंकज तडस यांनी सांगितली. त्यामुळे आता हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

माझे वडील भाजपचे खासदार रामदास तडस यांनी मला एक वर्षापूर्वी आपल्या परिवारातून संपत्तीतून बेदखल केलं आहे त्यामुळे माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. मी आधी वडिलांच्या आडून केलेल्या लग्नातही खूश होतो आणि आजही खूश आहे. वैदिक पद्धतीने त्याही वेळेस लग्न केलं होतं आणि आजही केले आहे. आज रीतसर नगरपालिकेत नोंदणी केली येवढेच. काही लोक राजकारण करत आहेत. घटनेची सत्यता सत्यता न जाणून घेता चाकणकरांनी एक बाजूने आपले मत मांडले ते योग्य नाही, असे खासदार पुत्र पंकज रामदास तडस यांनी सांगितले आहे.

विवाह झाल्यानंतर रामदास तडस यांच्या सुनेने पोलिसात दिलेली तक्रार मागे घेतली आहे. विधिवत व रजिस्टर लग्न झाल्याने मी नक्कीच आनंदी आहे असे सून पूजा यांनी सांगितले. नगरपालिकेमध्ये वैदिक लग्नाचे रजिस्टर होणार असल्याने घाबरलेल्या अवस्थेत व्हिडिओ रुपाली चाकणकर यांना पाठविला. त्यांनी त्याही परिस्थितीत जो आधार दिला, त्यासाठी त्यांचे आभार. आता कुणाबद्दलही माझी काहीही तक्रार नाही. वैदिक पद्धतीने विवाह झाला आहे आणि नगर परिषदेमध्ये त्याची नोंदही झाली आहे. त्यामुळे मी आनंदी आहे, असे पूजा म्हणाल्या. 

वर्धेचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकरानी एका ट्विट द्वारे केला होता. सोबतच तिची आपबीती सांगणारा व्हिडिओ देखील ट्विट केला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडाली आणि वेगाने हालचाली सुरू झाल्या. मात्र दिवसभराच्या घडामोडींनंतर संध्याकाळी विधिवत लग्न करून नगरपालिकेत लग्नाची नोंदणी करण्यात आली आणि झालेल्या दिवसभरातल्या घडामोडी वर पडदा पडला.

खासदार रामदास तडस हे स्वतः त्यांचा मुलगा व सुनेला प्रचंड मारहाण गेल्या अनेक दिवसापांसून करत आहेत. तिच्या जिवाला धोका आहे. पोलीस स्टेशनला तिला जाता येत नसल्याने तिला पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच खासदार रामदास तडस यांच्यासह त्यांच्या कुटुंबांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात रामदास तडस यांच्या सुनेने हे आरोप फेटाळून लावत रामदास तडस यांनी त्यांना मदत केली आहे. मारहाण त्यांचा मुलगा करत होता. काल सकाळी मी घाबरले होते. म्हणून हा व्हिडिओ चाकणकरांना पाठविला होता, असे सुन पूजा पंकज तडस शेंद्रे म्हणाल्या.  

मला न सांगता लग्न केले होते : खासदार तडस
माझा मुलगा पंकज तडसने सहा महिन्यांपूर्वी मला न सांगता पूजाशी लग्न केलं होतं. तेव्हापासूनच तो वेगळा वर्धेला आणि मी व माझी पत्नी, आम्ही देवळीला राहतो आहे. त्याचा संसार वेगळा आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला आणि ती देवळीला आली आणि माझ्या घरी राहू लागली. पण पंकज आला नाही. त्यामुळे मी तिला सांगितले की तू वर्धेला पंकज कडे जा आणि त्याला घेऊन देवळीच्या घरी ये. तुम्ही दोघेही येथे येऊन सुखाने नांदा, पण तिने तसं केलं नाही आणि ती आपल्या वडिलांकडे गेली तेव्हापासून आतापर्यंत माझी सून आपल्या वडिलांकडे राहत होती. हा नवरा बायकोचा आपसी वाद असल्यामुळे त्यांनीच तो मिटवावा, अशी माझी भूमिका होती.  ती आजही माझी सून आहे, पण राजकीय मंडळींनी हा घरगुती वाद मिटवण्यापेक्षा त्यावर राजकारण केलं, असे खासदार रामदास तडस म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in