फडणवीस म्हणाले, गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू...

युपीमध्ये सपा व बसपा ब्राम्हण संमेलने घेत आहेत. त्याचा फारसा परिणाम होणार नाही. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन भाजपने काम केले आहे. कोणी कोणत्याही समाजाला गळाला लावण्याचा प्रयत्न केला, तरी सारे समाज भाजपसोबत राहतील.
फडणवीस म्हणाले, गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू...
Devendra Fadanvis

नागपूर : सचिन वाझे प्रकरणी Sachin Waze case एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमधील सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मी अजून त्याचा अभ्यास केलेला नाही. पण यातील घटनाक्रम सरकारला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये पोलिस खात्यातील अधिकारी अशा प्रकारची घटना करू शकतात, यापेक्षा अजून धक्कादायक काय असू शकते, असा प्रश्‍न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadanvis यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. गोव्याचे निवडणूक प्रभारी 

गोवा  विधानसभा निवडणूक प्रभारी केल्याबद्दल जे. पी. नड्डा यांचे आभार मानतानाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन करू, असा विश्वास नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विशेषतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तम कार्य केले. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या आधारावर निवडून येऊ. गेली चार निवडणुका सातत्याने गोव्यात जात असल्याने गोव्याचा चांगला परिचय आहे. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिलाय. आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी नेहमी गोव्याच्या निवडणुकीत सक्रिय राहिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मदत राहील. अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांच्यासह दोन केंद्रीय राज्यमंत्रीही सोबत आहेत. आम्ही आमच्या परीने पूर्ण मेहनत करून गोव्यात भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा समजून घेईन नंतर मग काम सुरू करीन, असे फडणवीस म्हणाले.

राउतांच्या अहंकाराचा पराभव..
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही. बेळगावमध्ये संजय राउतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे. भाजपच्या निवडून आलेल्या नगर सेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त मराठी नगरसेवक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एका पक्षाचा पराभव या दोन गोष्टी सारख्या असू शकत नाही. सचिन वाझे प्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमधील सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मी अजून त्याचा अभ्यास केलेला नाही. पण यातील घटनाक्रम सरकारला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये पोलिस खात्यातील अधिकारी अशा प्रकारची घटना करू शकतात, यापेक्षा अजून धक्कादायक काय असू शकते, असा प्रश्‍न फडणवीस यांनी केला. 

यूपीत संपूर्ण समाज पाठीशी..
युपीमध्ये सपा व बसपा ब्राम्हण संमेलने घेत आहेत. त्याचा फारसा परिणाम होणार नाही. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन भाजपने काम केले आहे. कोणी कोणत्याही समाजाला गळाला लावण्याचा प्रयत्न केला, तरी सारे समाज भाजपसोबत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार रामदास तडस यांच्या कौटुंबिक वादाबद्दल त्यांच्याशी बोललो. त्यांचा मुलगा व सुनेचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता. त्यातून काही गैरसमज होऊन दुरावा निर्माण झाला आहे. सर्व गोष्टी समन्वयाने व्हाव्या आणि कायद्याचा कुठेही अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना तडस यांना केली असल्याचे फडणवीस म्हणाले. 

राणेंचा सहभाग नाकारू शकत नाही..
चिपी विमानतळ तयार करण्यात राणेंचा सहभाग कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या पुढाकारानेच चिपी विमानतळाचे काम सुरू झाले. नंतर मी मुख्यमंत्री असताना काम पूर्ण केले व त्याचे एक उद्घाटनही केले. आता तिथून विमानोड्डाण होणार आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे. अशा परिस्थितीत वाद न करता समन्वयाने काम केले पाहिजे. राज्य व केंद्राने समन्वयाने काम करायचे असते. श्रेयाचा वाद नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in