चंद्रकांतदादा ठरविणार सातारा जिल्हा बँकेसाठी भाजपची रणनिती - Chandrakantdada will decide BJP's strategy for Satara District Bank | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

चंद्रकांतदादा ठरविणार सातारा जिल्हा बँकेसाठी भाजपची रणनिती

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 8 सप्टेंबर 2021
सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी सर्व निवडणुकांच्या बाबतीत पक्षाचे धोरण ठरविणार आहेत.

सातारा : जिल्हा मध्यवतीर् सहकारी बॅंकेसह आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या (गुरुवारी) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि आजी- माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, तसेच ते विभागवार बैठकाही घेणार आहेत. 

जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकांबाबत भारतीय जनता पक्षाकडून कोणतीच भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लावण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या (गुरुवारी) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

हेही वाचा : आमदार रोहित पवारांनी पावसाच्या पाहणीसाठी चालविला ट्रॅक्टर

या दौऱ्यात ते दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत पक्षाच्या विभागवार बैठका घेणार आहेत. सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसह आगामी काळात होणाऱ्या पालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचे मंडल अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. 

आवश्य वाचा : माजी आमदाराचा मुलगा-नातू पुरात वाहून गेले; चोवीस तासानंतर मृतदेह सापडले..

यामध्ये ते सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी सर्व निवडणुकांच्या बाबतीत पक्षाचे धोरण ठरविणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर ही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा निवडणुकीबाबत असलेला संभ्रम दूर करून श्री. पाटील हे त्यांना आगामी काळात कोणती रणनीती वापरायची याविषयीही मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा हा दौरा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख