गोसीखुर्दचे १५ दरवाजे उघडले, सलग नवव्या दिवशीही विसर्ग सुरू…
Gosikhurd dam

गोसीखुर्दचे १५ दरवाजे उघडले, सलग नवव्या दिवशीही विसर्ग सुरू…

गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात सतत कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरण प्रशासनाने 24 तासात 4 वेळा दरवाजांची स्थिती बदलवण्याचा निर्णय घेतला आहे.

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पाच्या GosiKhurd Dam पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे. कालपर्यंत धरणाचे ९ दरवाजे उघडण्यात आले होते. पण पावसाचा वाढता जोर पाहता पुन्हा ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत ३३ पैकी १५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. Fifteen doors of gosikhurd opened by half meter.  यातून १६८६.६६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

विशेष म्हणजे सलग नवव्या दिवशीही पवनी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडे आहेत. गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात सतत कुठे संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरण प्रशासनाने 24 तासात 4 वेळा दरवाजांची स्थिती बदलवण्याचा निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी आलेल्या महापुराच्या धसका धरण प्रशासनाने घेतला. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या दरवाजांची उघड-बंद स्थिती सुरू आहे. नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.   गावाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला  आहे.

सध्या विदर्भात मुसळधार पाऊस बरसतो आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. अशातच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे ३३ पैकी १५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजांची स्थिती वारंवार बदलावी लागत आहे. पावसाची संततधार अशी कायम राहिल्यास गोसीखुर्दचे आणखी काही दरवाजे उघडले जातील, अशी शक्यता वर्तविली गेली आहे. 

गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, नागपूर, मध्यप्रदेशातील मंडला, बालाघाट, शिवणी, बैतुल, छिंदवाडा आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव यांचा समावेश आहे. तीन राज्यांतील ९ जिल्ह्यांत सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरण भरले. आज सकाळपासून तिसऱ्यांदा स्थिती बदलली आहे. या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ही स्थिती आली असल्याचे गोसीखुर्द प्रशासनाने सांगितले. 

गोसीखुर्दपासून वर्धापर्यंत वैनगंगेची वहन क्षमता ९ हजार क्युमेक्स म्हणजे ३ लाख १७ हजार क्युसीक्स आहे. मासेमारांनी नदीमध्ये जाताना सतर्कता बाळगण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. भंडारा जिल्हा अजूनही पाणी पचवू शकतो, असेही सांगितले जात आहे. नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पावसाचा परिणाम गोसीखुर्दवर होत नाही. पण गोसीखुर्द ओव्हरफ्लो झाला तर गडचिरोली जिल्ह्याला धोका संभवतो. सध्या सुरू असलेला पाऊस शेतीसाठी फायद्याचा ठरणार आहे. आज प्रकल्पाचे उघडण्यात आलेले दरवाजे नागपूरच्या पावसामुळे उघडण्यात आले आहेत. मध्यप्रदेशच्या संजय सरोवराने पाणी सोडल्यास आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
Edited By : Atul Mehere 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in