भाजपचा नेता तडीपार, राजकीय गोटात खळबळ...
Sarkarnama

भाजपचा नेता तडीपार, राजकीय गोटात खळबळ...

आता चरण वाघमारे यांच्यासोबत बांडेबुचे यांचे बिनसले असून बांडेबूचे यांनी आता भाजपचे दुसरे आमदार डॉ. परिणय फुके यांची कास धरली असून बांडेबूचे यांनी मुंढरी जिल्हा परिषदेची उमेदवारीसुद्धा मागितली होती.

भंडारा : नुकताच कार्यकाळ संपलेल्या भाजपच्या मोहाडी पंचायत समितीच्या Mohadi Panchayat Samiti माजी सभापतीचे पतीदेव व भाजपचे पदाधिकारी असलेले विश्वनाथ बांडेबूचे Vishwanath Bandebudhe यांच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना भंडारा Bhandara जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे बांडेबुचे यांनी एका भाजप एका आमदाराची कास धरत नुकतीच जिल्हा परिषदेची तिकीट मागितली होती. परंतु हद्दपाराच्या आदेशानेच घात झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. विश्वनाथ बांडेबूचे यांच्यावर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर हल्ला करून जखमी करण्याचाही बांडेबूचे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पोलिसांनी विश्वनाथ बांडेबूचे विरुद्ध तडीपाराचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यावर निर्णय घेऊन तुमसरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी बांडेबूचे यांना एक वर्षासाठी भंडारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. 

हा आदेश विश्वनाथ बांडेबूचे यांना १० सप्टेंबर रोजी तामील करण्यात येऊन त्यांना जिल्हा सोडून जाण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत काल मंगळवारी संपली असल्याने बांडेबूचे यांनी मोहाडी येथून आपले बस्तान गुंडाळल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या अगदी जवळचे व विश्वासू अशी विश्वनाथ बांडेबूचे यांची ओळख होती. मात्र त्यांच्या कामामुळे चरण वाघमारे यांनी बांडेबूचे यांच्याशी फारकत केली आहे. 

आता चरण वाघमारे यांच्यासोबत बांडेबुचे यांचे बिनसले असून बांडेबूचे यांनी आता भाजपचे दुसरे आमदार डॉ. परिणय फुके यांची कास धरली असून बांडेबूचे यांनी मुंढरी जिल्हा परिषदेची उमेदवारीसुद्धा मागितली होती. आमदाराकडून आश्वासन मिळाल्यावर बांडेबूचे कामाला सुध्दा लागले होते. परंतु तडीपारीच्या आदेशाने त्यांचा घात केला. आता बांडेबूचे यांच्या तोंडापर्यंत आलेला घासही गेला असल्याचे बोलले जात असून सोबत देणाऱ्या आमदारांचीही गोची झाली आहे. या कारवाईमुळे राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in