अशोक चव्हाण म्हणाले, तेव्हाच ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर…

भाजप नेते किरीट सोमय्या बेछूट आरोप करत सुटले आहेत किंबहुना भाजपने त्यांना यासाठी खुले सोडले असावे. उटसूठ आरोप करून केंद्रीय तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात आहे.
Ashok Chavan
Ashok Chavan

नागपूर : ओबीसी किंवा मराठा आरक्षणाच्या OBC or Maratha Reservation बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्याकडे मर्यादित पर्याय आहेत. हा विषय फक्त महाराष्ट्र किंवा मराठा, ओबीसी समाजापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशात हा विषय अडचणींचा बनला आहे. जेव्हा आरक्षणाचा विषय संसदेत आला तेव्हाच ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर विषय सोपा झाला असता, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज येथे म्हणाले. Minister Ashok Chavan. 

चंद्रपूर आणि यवतमाळ येथील कॉंग्रेसच्या कार्यक्रमांसाठी अशोक चव्हाण आज विदर्भात आले आहेत. येथील विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जालन्यातील मराठा तरुणाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. आपल्याला संयमाने घ्यावे लागेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आपल्याकडे मर्यादित पर्याय आहेत. मराठा आरक्षण मिळावे ही राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका होती. आपली रीविव्ह पिटीशन अद्यापही प्रलंबित आहे. तो पर्याय असताना परत मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची वेळ नव्याने आली आहे. या किती कालावधी लागेल, हे मी सांगू शकत नाही. मात्र सारथीच्या माध्यमातून समाजाला मदत केली जात आहे.

सूडबुद्धीने होणारे काम लोकशाहीला मारक..
भाजप नेते किरीट सोमय्या बेछूट आरोप करत सुटले आहेत किंबहुना भाजपने त्यांना यासाठी खुले सोडले असावे. उटसूठ आरोप करून केंद्रीय तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी मारक आहे. भाजपने सोमय्या यांना आवरावे, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतील, असेही चव्हाण म्हणाले. 

राऊत यांच्यावर आरोप झाले नाहीत..
ऊर्जा विभागाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नुकतीच सह्यांद्री अतिथिगृहावर बैठक घेतली. या बैठकीत कॉंग्रेसचे नेते पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आरोप केल्याने कॉंग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी उफाळल्याचे बोलले जात होते. पण या बैठकीत ऊर्जामंत्र्यांवर कुणीही आरोप केले नाहीत, असे चव्हाण यांनी सांगितले. ऊर्जा विभागात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.  

संभाजी राजेंनी पुढाकार घ्यावा..
संभाजी राजे यांनी अधिकाऱ्यांवर जी टीका केली ,त्या बद्दल मला काहीही बोलायचे नाही. सरकार व अधिकारी आपले काम व्यवस्थित करीत आहेत. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर काम करता सर्व तांत्रिक बाजू समजून घेऊन काम करावे लागते. संभाजी राजे यांनी देखील पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. 

आरक्षणाला कुणाचा विरोध आहे, कळत नाहीये..
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेणे योग्य होणार नाही. ओबीसी आरक्षण अध्यादेशाचा विरोध कुणाला आहे, त्याचे काही काही कळायला मार्ग नाही, असे संभाजी ब्रिगेडचे नाव न घेता मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com