रोहित पवार यांच्याकडून स्फूर्ती घेत 60 युवक बनले स्वच्छतादूत - In Rohit Pawar's campaign, 60 youths became sanitation ambassadors | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार यांच्याकडून स्फूर्ती घेत 60 युवक बनले स्वच्छतादूत

वसंत सानप
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

कर्जतमधील साठ स्वच्छतादुतांनी जामखेड येथे सायकलवर येत स्वच्छतेचा जागर केला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नागरिकांना स्वच्छतेचा संदेशही दिला. त्यातून त्यांची शहर स्वच्छ व सुंदर होण्याची तळमळ दिसून येत होती.

जामखेड : कर्जतमधील साठ स्वच्छतादुतांनी जामखेड येथे सायकलवर येत स्वच्छतेचा जागर केला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नागरिकांना स्वच्छतेचा संदेशही दिला. त्यातून त्यांची शहर स्वच्छ व सुंदर होण्याची तळमळ दिसून येत होती. 

आमदार रोहित पवार व त्यांच्या मातुःश्री सुनंदा पवार यांच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानांअंतर्गत जामखेड शहरात स्वच्छतेचा जागर सुरू आहे. नागरिकांच्या प्रबोधनासाठी "पाठकबाई' फेम सिनेअभिनेत्री अक्षया देवधर व केंद्र सरकारचे स्वच्छतादूत गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला.

या कार्यक्रमानिमित्त कर्जत येथून साठ स्वच्छतादूत सायकलवर जामखेडला आले होते. त्यांनी कर्जत शहरात राबविलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांची माहिती जामखेडकरांना सांगितली. नंतर ही रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचली. या वेळी त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यांची ही मोहीम जामखेडकरांना चांगलीच भावली.

हेही वाचा... पाठकबाई म्हणते रोहित पवार हेच जामखेडसाठी राणादा

या तरुणांधील 58 वर्षांचे कालिदास शिंदे अर्धांगवायूने त्रस्त असूनही या मोहिमेत जिद्दीने सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबरच सेवानिवृत्त सैनिक सत्यवान शिंदे यांनीही स्वच्छतादूत उपक्रमाला वाहून घेत काम सुरू केले आहे. 

राजू पठाण रोज सकाळी कर्जत शहरात ताशा वाजवून नागरिकांना जागे करीत आपल्या कामाला सुरवात करतात. त्यांनीही या कामात स्वतःला झोकून दिले आहे. या चमूबरोबर कर्जतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, "बीजीएस'चे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांचाही सहभाग होता. त्यांनी कर्जतमध्ये स्वच्छतेसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 

हेही वाचा... राजकारणाविरहित मोठे काम

या चमूमध्ये दिव्यांग असलेल्या अरुण माने यांचाही समावेश आहे. त्यांना जामखेडच्या कार्यक्रमाला येता आले नाही; मात्र तेही नियमित कर्जत शहरातील श्रमदानासाठी योगदान देतात. या सर्वांमुळे नागरिकांना प्रेरणा मिळते. 

हेही वाचा...

त्या नद्यांचे सुशोभिकरण

जामखेड : "शहरातील दोन्ही बाजुनीं आसलेल्या नदीच्या सुशोभिकीकरणासाठी शासनाकडे निधी मिळवा, याकरिताचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लवकरच धाकटी नदी व विंचरणा नदीचे रुपडे पालटणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूला पक्के रस्ते करणार आहोत, शासनस्तरावर मंजुरी अंतिम टप्प्यात आहे," अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

पवार म्हणाले," शहरातील सौंदर्यात भर घालण्यासाठी नदीचे सुशोभिकीकरण झाले पाहिजे. या ठिकाणी नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, व नागरीकांना फीरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक सह इतर सुविधा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. त्याला देखील लवकरच मंजुरी मिळेल असे सांगितले.

 

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख