`पाठकबाई` म्हणते, रोहित पवार हेच खरे जामखेडचे `राणादा` - `Pathakbai` says, Rohit Pawar is the real 'Ranada' of Jamkhed | Politics Marathi News - Sarkarnama

`पाठकबाई` म्हणते, रोहित पवार हेच खरे जामखेडचे `राणादा`

वसंत सानप
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

आमदार पवार हेच या मतदारसंघाचे खरे "राणादा' आहेत. त्यांनी कर्जत- जामखेडबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही स्वच्छतेचे काम करावे. ते महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र करू शकतात.

जामखेड : आपलं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी आपलं शहर स्वच्छ व सुंदर असावं, हा ध्यास उराशी बाळगून आमदार रोहित पवार व त्यांच्या मातुःश्री सुनंदाताई पवार काम करीत आहेत. त्यांनी "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर व स्वच्छतादूत गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा जागर केला. 

या वेळी देवधर म्हणाल्या, "आमदार पवार हेच या मतदारसंघाचे खरे "राणादा' आहेत. त्यांनी कर्जत- जामखेडबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही स्वच्छतेचे काम करावे. ते महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र करू शकतात.''

हेही वाचा... मनपा अधिकारी पैठणकर लाचलुचपतच्या जाळ्यात 

आमदार पवार म्हणाले, "जामखेड शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच चांगले रस्ते, बगीचे, क्रीडांगणे व अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत जामखेडचा चेहरामोहरा बदलून शहर स्वच्छ, सुंदर करणार आहे.''

या वेळी केंद्र शासनाचे स्वच्छतादूत गणेश शिंदे यांनी स्वच्छता व शौचालयाचे महत्त्व सांगितले. 

हेही वाचा.. जिल्हा बॅंकेला पुन्हा 27 लाखांना गंडा

नगरपालिकेच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सावळेश्‍वर उद्योगसमूहाचे संचालक रमेश आजबे, कर्जत-जामखेडचे विधानसभाप्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, अमोल गिरमे, लक्ष्मण ढेपे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

हेही वाचा...

विंचरणाचे रुप पालटणार

जामखेड : "शहरातील दोन्ही बाजुनीं आसलेल्या नदीच्या सुशोभिकीकरणासाठी शासनाकडे निधी मिळवा; यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लवकरच धाकटी नदी व विंचरणा नदीचे रुपडे पालटणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूला पक्के रस्ते करणार आहोत, शासनस्तरावर मंजुरी अंतिम टप्प्यात आहे," अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

विंचरणा नदीपात्राच्या कडेला तयार करण्यात आलेली भव्य दिव्य अशा नागेश्वराच्या 21 फुटी उंचीच्या मुर्तीचे अनावरण आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी वेदांतचार्य पांडुरंग शास्त्री देशमुख, बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार,
सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रा. प्रमुख मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे, सुर्यकांत मोरे, शिल्पकार प्रमोद कांबळे, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, रमेश आजबे, अमित जाधव. दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, प्रा लक्ष्मण ढेपे, मोहन पवार, अदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आमदार पवार म्हणाले," शहरातील सौंदर्यात  भर घालण्यासाठी नदीचे सुशोभिकीकरण झाले पाहिजे. या ठिकाणी नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, व नागरीकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक सह इतर सुविधा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. त्याला देखील लवकरच मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख