भंडारदर धऱण होणार चकाचक, तब्बल 73 कोटींची तरतूद

पहिल्या टप्प्यात 15 कोटी निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
Bhandardara.jpg
Bhandardara.jpg

अकोले : केंद्र सरकार व जागतिक बँकेच्या सहाय्याने भंडारदरा जलाशयाचे 94 व्या वर्षात भाग्य उजळले असून, 73.79 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने जलाशय चकाचक होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 15 कोटी निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे . 

शेंडी (ता. अकोले) येथे प्रवरा नदीवर 1910 ते 1926 या कालावधीत दगडात हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची साठवण क्षमता 11 हजार 039 दशलक्ष घनफूट असून, 300 दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. धरणास 94 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 1967 या वर्षी कोयना परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपामुळे 1969 मध्ये या धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते, तदनंतर 1969 ते 73 या कालावधी मध्ये भंडारदरा धरणाचे मजबुतीकरण काम पूर्ण करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने मुख्य धरणास आधार देणे, प्रिस्ट्रेस केबल बसविणे, सांडव्यामध्ये नवीन वक्राद्वारे बसविणे, सिमेंट ग्राऊटींग करणे, याचबरोबर धरणावर वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे बसविणे आदी कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.

1973 ते आजपर्यंत भंडारदरा धरणावर कोणत्याही प्रकारचे मोठ्या स्वरुपात विशेष दुरुस्तीची अथवा मजबुतीकरणाचे कामे करण्यात आलेली नाहीत. सध्यस्थितीत केंद्रीय जल अयोग यांच्या मार्फत जागतिक बँक सहाय्याने असलेल्या धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा 2 (ड्रीप 2) अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम प्राधान्याने असलेल्या 30 प्रकल्पामध्ये भंडारदरा धरणाचा समावेश करण्यात आलेला आहे.

विश्राम ग्रह सांडवा भिंत, आधुनिक भूकंप मापन केंद्र, निळवंडे प्रमाणे नवीन डिझाईन पद्धतीने भंडारदरा जलाशयाची कामे होणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले, त्यामुळे जागतिक बँकेमार्फत भंडारदरा जलाशय 94 वर्षेनंतर आपले आरोग्य सुधारून चकाचक होणार आहे.

देशातील अनेक धरणांपैकी महाराष्ट्रातील दहा धरणे धोकादायक म्हणून सयुंक्त राष्ट्र संघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत, त्यात भंडारदरा जलाशयाचा समावेश आहे. उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून भंडारदरा तसेच घाटघर, जायकवाडी या जलाशयाचा धोकादायक जलाशयामध्ये समावेश असल्याने भविष्य काळात या धरणांना धोका निर्माण होऊ शकतो, असे अहवालात नमूद केले आहे, मात्र जागतिक बँकेच्या सहाय्याने भंडारदरा जलाशयाचे काम सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com