व्हीआरडीचे स्थलांतर नव्हे, होणार विस्तारीकरण, खासदार डाॅ. सुजय विखे यांचा पुढाकार - VRD will not be relocated, it will be expanded, MP Dr. Initiative by Sujay Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

व्हीआरडीचे स्थलांतर नव्हे, होणार विस्तारीकरण, खासदार डाॅ. सुजय विखे यांचा पुढाकार

मुरलीधर कराळे
शनिवार, 20 मार्च 2021

व्हीआरडीईचे स्थलांतर होणार नाही. तसे लेखी पत्रच आपण घेतले आहे. उलट या संस्थेचे विस्तारीकरण होऊन नवीन प्रकल्प येतील, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

 

नगर : येथील व्हीआरडीईचे स्थलांतर होणार नाही. तसे लेखी पत्रच आपण घेतले आहे. उलट या संस्थेचे विस्तारीकरण होऊन नवीन प्रकल्प येतील, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

खासदार पाटील यांनी आज दिल्लीत संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली. नवी दिल्लीतील प्रमुख अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकित नगरच्या व्हिआरडीबाबत सविस्तर चर्चा झाली. मागील काही दिवसांपूर्वी स्थलांतराबाबत चर्चा झाल्या होत्या. नगरचे मोठे युनिट नगरबाहेर जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने अनेकजण बेरोजगार होतील, अशी शक्‍यता होती. याबाबत खासदार विखे पाटील यांनी दिल्लीत जाऊन संबंधित विभागाशी चर्चा केली व त्यातील सत्य जनतेसमोर आणले. 

हेही वाचा... नगरची वाटचाल लाॅकडाऊनच्या दिशेने

ते म्हणाले, की व्हीआरडीईमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, अरणगावचे ग्रामस्थ यांनी काळजी करू नये. व्हिआरडीईचे कोणतेही स्थलांतर होणार नाही. मला मिळालेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे, की संस्थेचे कस्थलांतर होणार नाही. उलट नगरला नवीन काही प्रकल्प आणण्याचा शासनाचा विचार आहे. तसेच भविष्यात त्याचे विस्तारीकरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानल्याचेही विखे पाटील म्हणाले. 
 

हेही वाचा... सहकारी संस्थांच्या सभेस थोरात उपस्थित राहणार

 

हेही वाचा...

27 मार्च पासून काही विमानसेवा वाढण्याची शक्‍यता 

पोहेगाव : शिर्डी विमानतळाचे नाईट लॅंडिंगचे काम अंतीम टप्यात आले आहे. त्यास तांत्रिक मंजुरीसाठी नागरी उड्डाण संचालयानाकडे (डी. जी. सी.ए.) पाठविण्यात आले आहेत. त्यांचे पथक काकडीत येऊन कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरी नंतर या ठिकाणी रात्रीची विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या दिड महिन्यात या मंजुऱ्या मिळून येथे नाईट लॅंडिंग सुरू होऊ शकते. 

डी.जी. सी. ए.कडे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने मंजुरीसाठी कागदपत्रे पाठविली आहेत. यासाठी विविध कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणी करूनच परवानगी देत असते. रनवे, दिवे व इतर नाईट लॅंडीगसाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबी या ठिकाणी अंतिम टप्यात असल्याच्या माहितीस शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दुजोरा दिला आहे.

जेथे गरज असेल, तिथे बदल सुचविले जातात व ते काम पूर्ण झाल्यावर परवानगी मिळते. यासाठी सुमारे तीनशे पानाचा अहवाल प्राधिकरणाने तयार केलेला आहे. रात्रीची सेवा सुरु झाल्यानंतर येथील विमानतळास आणखी चालना मिळेल. या ठिकाणी कार्गो सेवा सुरु करण्याबाबतही लवकरच विचार होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख