राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई ! सत्कार समारंभातच जुळली नाती - Ram Shinde gets collector's son! Matching grandchildren at the reception | Politics Marathi News - Sarkarnama

राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई ! सत्कार समारंभातच जुळली नाती

वसंत सानप
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हे नाते गुंफले गेले. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत.

जामखेड ः श्रीकांत बी.टेक करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आय. ए. एस. झाले. त्या नागरी सत्कारातच माजी मंत्री राम शिंदे आणि खांडेकर कुटुंबाची ओळख झाली. या कार्यक्रमातूनच सोयरीकीच्या नात्याची 'वीण' घट्ट होत गेली. शिंदे-खांडेकर व्याही झाले. डॉ. अक्षता आणि जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा साखरपुडा झाला.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हे नाते गुंफले गेले. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत. 

हेही वाचा... तर वर्षा बंगल्यावरच शिवजयंती साजरी करू 

अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरकडील घराण्यातील राम शिंदे हे वारसदार आहेत, परंतु माजी मंत्री राम शिंदे यांच्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केले होते. त्यामुळे अर्थातच शिंदे हे संघर्षातूनच राजकारणात पुढे आले आहेत. राम शिंदे यांच्या घरात यंदा कर्तव्य आहे. ज्येष्ठ कन्या डॉ. अक्षता हिचा नुकताच 'साखरपुडा' झाला.

वावची (ता. मंगळवेडा, जि. सोलापूर) येथील खांडेकर कुटुंब त्यांचे व्याही झाले. चौंडीत हा समारंभ झाला. माजी मंत्री राम शिंदे आणि आशा शिंदे यांच्या कुटुंबातील हे पहिलेच कार्य. त्यामुळे या दिमाखदार सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली. माजी मंत्री राम शिंदे आणि त्यांची पत्नी आशाताई हे मधली काही वर्षे सोडली, तर ते कायम चौंडीत वास्तव्यास होते.

हेही वाचा... पिचडांना धक्का

झेडपीच्या शाळेत शिकल्या मुली

त्यांच्या दोन्ही मुलींनी चौंडीच्या जिल्हा परिषद शाळेतूनच आपल्या शिक्षणाचा 'श्री गणेशा' केला. पुढे माध्यमिक शिक्षण जामखेडला, तर उच्च शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात केले. राम शिंदे राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे त्यांना फार लक्ष देता यायचे नाही. पत्नी आशा यांनीच मुलांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले.

दुसरी मुलगीही डॉक्टर

आशा यांनी पतीवर मंत्रिपदाची जबाबदारी आल्यावर पुणं सोडलं नाही. त्याच कारणच मुळी मुलींचे शिक्षण होतं. त्यामुळेच थोरली मुलगी अक्षता एम.बी.एस. झाली. तर दुसरी अन्विता एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला आहे. आमदारकीचा मान मिळाल्यानंतर त्यांना अजिंक्य नावाचे पूत्ररत्न झाले. त्याच्या शिक्षणाचा श्री गणेशा मात्र विद्येच्या माहेरघरी झाला. तो आता पाचवी इयत्तेत शिक्षण घेतो आहे.

कसे जुळले नाते

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरिबिशी झगडत श्रीकांत खांडेकर यांनी बीटेकचे शिक्षण दापोली येथून पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आय.ए.एस. होण्याच स्वप्न उराशी बाळगलं. त्यांना या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले. ते आय. ए. एस. होत जिल्हाधिकारी झाले. त्यांच्या या प्रेरणादायी यशाचे कौतुक ग्रामस्थांनी नागरी सत्काराने करण्याचे ठरविले. हा सत्कार माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचा ठरले.

कोण आहेत मंगळवेढ्याचे खांडेकर कुटुंब

माजी मंत्री शिदेंनाही श्रीकांत यांनी गरिबीतून मिळविलेल्या यशाचे मोठे अप्रूप वाटले. त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून येणाचे कबूल केले. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या घरी राम शिंदे गेले. श्रीकांत यांना अवघी नऊ एकर शेतजमीन आहे. त्यात तीन भावंडे. त्यांच्या आई-वडीलांनी कष्टाने मुलांना शिकवलं. मोठा मुलगा संतोष हा विवाहित असून, एका पाईपच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे. धाकट्या महेशची बी.एस्सी. झालीय. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख