मनसेने राबविले अनेक उपक्रम, वर्धापनदिनी केला विविध कार्याचा संकल्प - MNS carried out many activities, decided various activities on the anniversary | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेने राबविले अनेक उपक्रम, वर्धापनदिनी केला विविध कार्याचा संकल्प

मुरलीधर कराळे
मंगळवार, 9 मार्च 2021

मनसेचा आज वर्धापनदिन होता. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती शहरप्रमुख नितीन भुतारे यांनी दिली.

नगर : महा नवनिर्मान सेनेच्या वतीने नगर जिल्ह्यात कमी पदाधिकारी असतानाही विविध उपक्रम राबविले. शाळेची फी, वीज बिले, खासगी रुग्णालयांकडून लूट, मायक्रोफायनान्सकडून लूट असे विविध समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली.

मनसेचा आज वर्धापनदिन होता. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली.

पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून अनेक कामे मार्गी लागले.

मनसेने विविध प्रश्नी आंदोलने छेडली. शाळेची फी कमी करण्यासाठी आंदोलन केल्याने अनेक शाळांनी गरीब विद्यार्थ्यांच्या फी कमी केल्या. तसेच काही शाळांनी माफही केल्या. मनसेच्या या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले.

हेही वाचा... प्रताप दिघावकर लक्ष घालणार

कोविडच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आले. त्याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. त्यामुळे रुग्णालयांवर कारवाई होऊन अनेकांनी रुग्णांची अतिरिक्त बिले मागे दिली. जिल्ह्यातील 17 हाॅस्पिटलकडून सुमारे दोन कोटी कोरोना रुग्णांना परत देण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी विशेष प्रयत्न केले.

वाढीव वीजबिलाबाबत मनसेने आंदोलन छेडले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वीज बिल माफीबाबत मोर्चा काढला. त्यामुळे वाढीव बिले कमी करण्यात आले. 

हेही वाचा... विधान परिषद सदस्यांना हवाय हा अधिकार

पाथर्डी, कोपरगाव, पारनेर आदी ठिकाणी शेतकऱ्यांची वीज तोडल्याने शेतकरी हतबल झाले. याबाबत महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे ही कारवाई तूर्त थांबविण्यात आली.

नगर- दाैंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेने आंदोलन छेडले. त्यामुळे रस्तादुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष दिले. स्थानिक आमदारांना निवेदने देऊन विविध प्रश्न मार्गी लावण्यात मनसेचे कार्यकर्ते यशस्वी झाले.

कोरोना काळात धार्मिक स्थळांना परवानगी मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने दिली. महापालिकेत आरोग्य विभागात असलेल्या बोगस कारभारावरही मनसेने ताशेरो ओढले.

जिल्हाभरातही पक्षाच्या वतीने महिला, बालकांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने छेडली. जिल्ह्यातील खराब रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांना निवेदने दिली. नगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील रस्ता, कापडबाजारातील कोंडी, वाहतुकीची ठिकठिकाणी होणारी कोंडी, अशा विविध प्रश्नांवर मनसेच्या नेत्यांनी आवाज उठविला. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागू शकले.

समाजातील सर्वसामान्य घटकांना जोडण्यासाठी मनसेच्या वतीने विशेष प्रयत्न झाले. पक्षवाढीसाठी जिल्हाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन विविध प्रश्नांवर हे कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे जिल्ह्यात मनसेचा आवाज इतर पक्षांबरोबर घुमतो आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख