विधान परिषदेच्या सदस्यांना हवाय जिल्हास्तरीय बैठका घेण्याचा अधिकार - Legislative Council members have the right to hold district level meetings in Hawaii | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेच्या सदस्यांना हवाय जिल्हास्तरीय बैठका घेण्याचा अधिकार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 मार्च 2021

विधान परिषदेच्या आमदारांचे कार्यक्षेत्र जास्त जिल्ह्यांचे असते. अशा वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी बैठका घेण्याचा अधिकार असायलाच हवा.

मुंबई ः प्रत्येक जिल्ह्यातील विविध योजनांबाबत स्थानिक आमदार बैठका घेऊन विविध निधितून कामे करून घेतात, परंतु विधान परिषद सदस्यांना तसे करता येते का, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी आज विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. याबाबत कायदेशिर बाबी तपासून सांगितले जाईल, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

प्रत्येक आमदारांना विविध हेडच्या माध्यमातून निधी वापरता येतो. डोंगरी विकास निधीसारखे निधी आमदार निधी म्हणून वापरले जातात. याबाबत जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे अधिकार विधानसभा सदस्यांना असतात. असे अधिकार विधान परिषद सदस्यांना आहेत, का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर इतर काही आमदारांनी आपापले मत व्यक्त केले. बहुतेकांनी असा अधिकार आहे का, याबाबत विचारणा करीत तसा अधिकार मिळावा, अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की विधान परिषदेच्या आमदारांचे कार्यक्षेत्र जास्त जिल्ह्यांचे असते. अशा वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी बैठका घेण्याचा अधिकार असायलाच हवा. काही आमदारांकडे आठ जिल्हे आहेत. त्यांनाही त्यांच्या परिसरात विकासासाठी काही निधीची गरज आहे. तो मिळाला पाहिजे.

याबाबत लवकरच संबंधित आमदारांना कळविले जाईल, असे विधान परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितले.

 

हेही वाचा..

बाजार समितीच्या सभापतिपदी डॉ. शिंदे 

नेवासे : नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भेंडे बुद्रुक येथील डॉ. शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती कडूबाळ कर्डिले यांची मुळा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा... हे तर गृहखात्याचे अपयश ः विखे

आज रोजी सभापतीपदाची निवड प्रक्रिया नगर येथील उपनिबंधक एस. एल. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. त्यात डॉ. शिवाजी शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

या वेळी डॉ. शिंदे यांचा ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख व मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जबाजी फाटके, नारायण लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, मुकींदपूरचे सरपंच दादासाहेब निपुंगे, अशोक जेम्स उपस्थित होते. 

हेही वाचा... मूलचंदानी यांना अटक

जेष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासे कृषी उत्पन्न बाजार समिती असून, समितीने शेतकरी, व्यापारी-ग्राहक, कामगार, हमाल-मापाडी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले असून, बाजार समितीच्या मुख्य आवारासह घोडेगाव, कुकाणे उपबाजार आवारात मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख