पक्षनिष्ठेचे धडे नि मौन! खासदार प्रीतम मुंडे यांच्या विधानावर रक्षा खडसे यांची चुप्पी - Lessons of partisanship and silence! Raksha Khadse's silence on MP Pritam Munde's statement | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षनिष्ठेचे धडे नि मौन! खासदार प्रीतम मुंडे यांच्या विधानावर रक्षा खडसे यांची चुप्पी

सतीश वैजापूरकर
रविवार, 21 मार्च 2021

दोघींना सामान्य भाविकांप्रमाणे दर्शनपास, दर्शनरांगेत तिष्ठत राहण्याची वेळ आली नाही. सुलभ दर्शन झाले. त्यामुळे खडसे यांनी साईदर्शनाची व्यवस्था फारच उत्तम होती, असा बगाटे यांना हवा असणारा अभिप्राय त्यांनी संस्थानच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना दिला.

शिर्डी : भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी येथील पक्ष पदाधिकाऱ्यांना निष्ठेचे धडे दिले, तर त्यांच्यासोबत असलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी मैत्रिणीच्या विधानांवर भाष्य न करता, साईदर्शनाची व्यवस्था उत्तम होती, असा हवा असणारा अभिप्राय साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांना दिला. 

खासदार रक्षा खडसे यांचे सासरे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून जळगाव महापालिकेत भाजपला नुकताच जोराचा झटका दिला. त्यामुळेच तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये असलेल्या खासदार खडसे यांनी पक्षाबाबत बोलणे टाळले असावे. खासदार मुंडे यांनी कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेचा मंत्र दिला. मात्र, रक्षा खडसे यांचे सासरे पक्षनिष्ठेत कधीही कमी पडल्याचे दिसले नाही.

हेही वाचा... नगरची वाटचाल लाॅकडाऊनच्या दिशेने

कदाचित त्यामुळेच त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. मात्र, त्यांची अडचण साईसंस्थानचे अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्यामुळे दूर झाली असावी. कारण, त्यांनी साईदर्शन व्यवस्थेबाबत अभिप्राय मागितला. व्हीआयपी दर्जा असलेल्या या दोघींची दर्शनव्यवस्था बगाटे यांनी स्वतः उपस्थित राहून केली.

दोघींना सामान्य भाविकांप्रमाणे दर्शनपास, दर्शनरांगेत तिष्ठत राहण्याची वेळ आली नाही. सुलभ दर्शन झाले. त्यामुळे खडसे यांनी साईदर्शनाची व्यवस्था फारच उत्तम होती, असा बगाटे यांना हवा असणारा अभिप्राय त्यांनी संस्थानच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना दिला. 

हेही वाचा... सहकारी संस्थांच्या सभा होणार आॅनलाईन

मुंडे यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे हे मूळचे भाजपचे. घुसमट झाल्याने राष्ट्रवादीत जाऊन मंत्री झाले. बीड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर पेच निर्माण केला. इकडे खासदार मुंडे यांनी येथील पदाधिकाऱ्यांना पक्षनिष्ठेचा महिमा सांगितला. जळगाव महापालिका व बीड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे कवित्व सुरू असताना, दोघी मैत्रिणींनी साईसमाधीवर माथा टेकविला. 

मुुंडे यांच्याकडून एकनिष्ठेचा मंत्र 

सर्वसामान्य कार्यकर्ते असलेले शिवराजसिंह चौहान पहिल्यांदा आमदार झाले. त्यांना दिल्लीला बोलाविले. ते एक दिवस उशिरा तेथे पोचले, पक्षाने आपल्याला मुख्यमंत्रिपद दिल्याचे त्यांना तेथे गेल्यावर समजले. राम शिंदे यांच्याबाबतही हेच घडले. राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद दिले होते, ही बाब खासदार प्रीतम मुंडे यांनी येथील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 

 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख