सहकारी संस्थांच्या वार्षिक सभेस थोरात उपस्थित राहणार, पण ऑनलाईन - Thorat will attend the annual meeting of the co-operatives, but online | Politics Marathi News - Sarkarnama

सहकारी संस्थांच्या वार्षिक सभेस थोरात उपस्थित राहणार, पण ऑनलाईन

आनंद गायकवाड
शुक्रवार, 19 मार्च 2021

दुपारी तीन वाजता संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ऑनलाईन वार्षिक सभा होणार आहे.

संगमनेर : राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शनिवार ( ता. 20 ) व रविवार ( ता. 21 ) रोजी संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने शनिवारी सकाळी 11 वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची, तर दुपारी साडेबारा वाजता हरिश्चंद्र सहकारी पाणीपुरवठा फेडरेशन तसेच एक वाजता गरुड कुक्कुटपालन सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

दुपारी तीन वाजता शेतकी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहेत. रविवार (ता. 21 ) रोजी सकाळी 11 वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, या सभेचे थेट प्रक्षेपण कारखान्याच्या यु ट्यूब चॅनेलवर होणार आहे.

हेही वाचा... जिल्ह्यातील सेवा संस्था होणार आॅनलाईऩ

दुपारी तीन वाजता संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ऑनलाईन वार्षिक सभा होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्ती व शासकीय नियमांचे पालन करून या सर्व सहकारी संस्थांच्या सभा ऑनलाइन होणार आहेत. या वेळी अमृत उद्योग समूहातील व विविध संस्थांचे पदाधिकारी ही ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.
 

हेही वाचा...

नवीन शैक्षणिक धोरणामुळे युवकांमध्ये कौशल्य निर्माण होणार

संगमनेर : प्राथमिक शिक्षणात मातृभाषा सक्तीची करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्याला सखोल ज्ञान मिळणार आहे. शिक्षणात कला, वाणिज्य व विज्ञान अशा शाखा असणार नाहीत. तर विद्यार्थी त्याच्या आवडीचे कोणतेही विषय घेऊन शिक्षण घेऊ शकतो. या शैक्षणिक धोरणात उद्योग आणि शिक्षणक्षेत्राची योग्य सांगड घालून रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांनीही यापुढे आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले.

श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक चर्चा मंडळांतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. 

हेही वाचा... अर्सेनिक अल्बम संशयाच्या फेऱ्यात

ते म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीचा विचार करुन तयार केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातील व्यावसायिक शिक्षणावर भर दिल्याने, युवकांमध्ये कौशल्य निर्माण होणार आहे. व्यावसायिक शिक्षणावर या धोरणात भर देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च सरकार शिक्षणावर करणार आहे. त्यामुळे देशाचा शैक्षणिक व आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व महाविद्यालये टप्याटप्याने स्वायत्तत्तेकडे जाणार असल्यामुळे गुणवत्तेला महत्त्व येणार आहे.

उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराचे शिक्षण मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे आहे.

या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक आप्पासाहेब गुंजाळ, समिती कार्याध्यक्ष डॉ. मारुती कुसमुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर जेजुरकर यांनी केले. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख