गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा - Home Minister Deshmukh should resign | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा

सचिन सातपुते
सोमवार, 22 मार्च 2021

गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी विश्वासार्हता गमावली असून, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शेवगाव शहरातील क्रांती चौकात रास्तारोको आंदोलन केले.

शेवगाव : काही दिवसांपासून होणाऱ्या आरोप व घडामोडींमुळे राज्यातील आघाडी सरकारने गृहखात्याची व पोलीस दलाची अब्रु चव्हाट्यावर आणून प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी विश्वासार्हता गमावली असून, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शेवगाव शहरातील क्रांती चौकात रास्तारोको आंदोलन केले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले की, महाराष्ट्र व मुंबई पोलीस दल हे देशातील सर्वात नावाजलेले पोलीस दल आहे. त्यातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही बाब सरकार व पोलीस दलासाठी अशोभनीय आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख व सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्वरीत राजीनामा द्यावा. 

हेही वाचा... साकळाई योजना थेट संसदेत

या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब पाटेकर, वजीर पठाण, भिमराव सागडे, कचरु चोथे, गणेश कराड, उमेश धस, गुरुनाथ माळवदे, सालार शेख, बाळासाहेब डोंगरे, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, नितीन फुदे, वाय. डी. कोल्हे, अशोक गाढे, अशोक ससाणे, लाला शेख, गंगा खेडकर, नवनाथ कवडे उपस्थित होते. 

हेही वाचा... सीताराम गायकर यांनी पिचडांचे काम केलेच नाही

 

हेही वाचा...

कायदा भंग करणाऱ्यांना 52 हजारांचा दंड 

नगर : महापालिकेच्या दक्षता पथकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 114 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 52 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. 

महापालिकेचे उपायुक्‍त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्‍त संतोष लांडगे, पथक प्रमुख शशिकांत नजान, अभियंता परिमल निकम, कल्याण बल्लाळ यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. शहरातील कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, चितळे रस्ता, झेंडीगेट, बालिकाश्रम रस्ता, सर्जेपुरा, भाजी मार्केट, रेल्वेस्थानक, हॉटेल, मंगल कार्यालय आदी ठिकाणी अचानक भेटी देत ही कारवाई करण्यात आली. पथकात के. पी. जाधव, विजय बोधे, सूर्यभान देवघडे, नंदकिशोर नेमाणे, अमोल लहारे, राहुल साबळे, भास्कर आकुबत्तीन यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 

Edited By - Murlidhar karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख