सीताराम गायकर यांनी विधानसभेत पिचड यांचे काम केलेच नाही - Gaikar did not do the work of Pichad in the assembly | Politics Marathi News - Sarkarnama

सीताराम गायकर यांनी विधानसभेत पिचड यांचे काम केलेच नाही

शांताराम काळे
रविवार, 21 मार्च 2021

विधानसभा निवडणुकीत शरीराने भाजपमध्ये राहून अजितदादा पवार यांची सुपारी घेऊन सीताराम गायकर, परबत नाईकवाडी यांनी भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांना पराभूत केले.

अकोले ः भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सीताराम गायकर व त्यांच्या समवेत गेलेल्यानी माजी आमदार वैभव पिचड यांचे विधानसभेत काम केलेच नाही, अजित दादांच्या संपर्कात राहून त्यांनी भाजपशी गद्दरी केली, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत शरीराने भाजपमध्ये राहून अजितदादा पवार यांची सुपारी घेऊन सीताराम गायकर, परबत नाईकवाडी यांनी भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांना पराभूत केल्याचा आरोपही भांगरे केला आहे.

हेही वाचा... आमदार राजळेंच्या मतदारसंघात बोंबाबोंब

ते पत्रकारांशी बोलत होते. सीताराम गायकर यांनी आपण १४ महिने भाजपमध्ये अस्वस्थ होतो. भाजप प्रवेशाचा फायदा झाला नाही, असे वक्तव्य केल्याने सीताराम भांगरे, भाजपगट नेते जालिंदर वाकचौरे यांनी सीताराम गायकर व त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यावर जोरदार टीका केली.

हेही वाचा... ग्रामसेवकास महिलेने चपलाने चोपले

गायकर हे संधीसाधू असून, विधानसभा निवडणुकित अजितदादा व गायकर यांचे मॅच फिक्सिंग झाले होते. त्यामुळेच कुंपणाने शेत खाल्ले. ज्यांच्या विश्वासावर माजीमंत्री मधुकर पिचड यांनी विधानसभा निवडणुकीचे सूत्र ज्यांच्या हातात दिले, त्यांनी पिचड यांच्या पाठिंबा खंजीर खुपसला, असे सांगताना जिल्हा बँकेत झालेला भ्रष्ट्राचार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये गायकर गेले असून, भाजपने त्यांच्या भ्रष्टाचाराची इडीमार्फत चौकशी लावायची का? स्वतःचे नातेवाईक बँकेत लावून अध्यक्ष पदावर असताना बँक हॅक केली, तर जिल्हा बँक नोकर भरती, फर्निचर खरेदीचा व्यवहारात मोठा भ्रष्ट्राचार झाला असून, केवळ आपले भ्रष्टाचारच लपविण्यासाठी जे अजितदादा धोतर फेडणार होते, त्यांच्या पदराखाली लपून बसण्याची वेळ गायकर यांच्यावर आली आहे, असेही सीताराम भांगरे म्हणाले .
 

हेही वाचा...

महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक..

मिरजगाव : मिरजगाव परिसरातील अनेक गावातील पीके महावितरणने केलेल्या वीजपुरवठा कपातीमुळे धोक्यात आली आहेत. आधीच कोरोना मुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता वीजकपातीच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात मिरजगावसह परिसरातील बाभूळगाव, बेलगाव, नागलवाडी, नागपूर, शितपूर, माहिजळगाव, रातंजन, घुमरी, तिखी आदी गावातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा कपात केल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, कर्जत तालुक्यातील अनेक गावांत महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. त्यामुळे उन्हाळी पिके जळू लागली आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही वीज बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख