शुभमंगलं... पण सावधान ! राजकारणी येणार, पण उशिरा - Good luck ... but beware! Politicians will come, but late | Politics Marathi News - Sarkarnama

शुभमंगलं... पण सावधान ! राजकारणी येणार, पण उशिरा

विनायक दरंदले
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

पत्रिका वाटल्या, अग्रहाचं आमत्रंण दिल्यानंतर आता सहकुटुंब नाही तर एकटेच विवाहाला या आणि भेटून लगेच जा असे आप्तेष्टांना म्हणण्याची वेळ आली आहे.

सोनई : विवाह सोहळ्याच्या हजार-दोन हजार पत्रिका वाटल्या. मंगल कार्यालय, जेवण व इतर सर्व नियोजन केले. सहकुटुंब उपस्थित राहावे म्हणून अग्रहाचं निमंत्रण दिलं, मात्र वरबाप व वधूपित्यांवर दिलेलं आमत्रंण पुन्हा माघारी घेण्याची वेळ आली आहे.  जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांनी कोरोना संसर्गाची दुसरी लाट लक्षात घेवून विवाह समारंभ पन्नास जणांच्या उपस्थित साजरा करा अन्यथा कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर अगोदरच मोठे नियोजन करुन बसलेल्या वर-वधूपित्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा... पाठकबाई म्हणते, रोहित पवार हेच राणादा

दरम्यान, विविहसमारंभांना राजकारण्यांची हजेरी असते. वधु-वरांना शुभाशिर्वादही देण्याची संधी ते सोडत नाहीत. मात्र प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने राजकारणी मंडळी विवाहाला उपस्थिती दर्शवितात, परंतु लग्न लागण्याच्या आधी किंवा नंतर भेट देऊन तेथून निघून जातात. कारवाईची नको ती झंजट म्हणून हा शाॅर्टकट अनेकजण वापरताना दिसत आहेत.

हेही वाचा... त्या नेत्यांना शटलमेंटची सवय

पत्रिका वाटल्या, अग्रहाचं आमत्रंण दिल्यानंतर आता सहकुटुंब नाही तर एकटेच विवाहाला या आणि भेटून लगेच जा असे आप्तेष्टांना म्हणण्याची वेळ आली आहे. 

नेवासे तालुक्यात तीसहून अधिक मंगल कार्यालय व लाॅन्स आहेत.विवाहाच्या 20,21,22,24 व 28 तारखा आरक्षित झाल्या आहेत. एका महिन्यापासून 
धुमधडाक्यात विवाह होत असल्याने या महिन्यातील सर्व विवाहाचे नियोजन पूर्ण झाले. उपस्थितीचे बंधन आल्याने आता सर्वापुढे मोठा विवाह लहान कसा करावा, असा प्रश्न उभा राहिला आहे.

गडाखांना भेटणार

विवाह उपस्थितीबाबत अजुन तरी नोटीस आलेली नाही. अगोदरच जास्त उपस्थितीचे नियोजन झाल्याने प्रशासनाने फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रश्न समजून घ्यावा. मार्चपासून काटेकोर पालन केले जाईल. आज सर्व मंगल कार्यालय चालकांची बैठक घेवून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना भेटणार आहे, असे मंगल कार्यालयाचे संचालक सनी पिसाळ यांनी सांगितले.

एक हजारपेक्षा जास्त नातेवाईक,मित्र व स्नेहीजणांना आमत्रंण दिले. स्वयपाकाचे साहित्य आणले. वाहनांना भाडे दिले. अचानक गर्दी नियंत्रण संबधी आदेश आल्याने दिलेले आमत्रंण मागे घेण्याची वेळ आली आहे, असे मत वरपिता संजय फुंदे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, राज्यभर कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहेत. मंगल कार्यालयांची नोंदणीही रद्द होऊ लागली आहे. बहुतेकजण पुन्हा लहान स्वरुपात लग्न उरकण्याचा प्रय़त्न करू लागले आहेत.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख