मोठ्याच्या घरी पोरगी द्यायची अन... ! राम शिंदे असे का म्हणाले? 

मतदारांना ही कळलयं "मोठ्याच्या घरी पोरगी द्यायची, अन्‌ भेटायची अडचण करुन घ्यायची,' कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधीला भेटताना किती आडचण होते, याचा अनुभव दीड वर्षात अनेकांनी घेतला आहे.
Ram shinde.jpg
Ram shinde.jpg

जामखेड : "जामखेड नगरपालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात येईल, असा प्री-ईलेक्‍शन पोल आला आहे. त्याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आम्ही देवू, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कर्जत-जामखेडचे दोन्ही संचालक भाजपचे निवडून आले, यावरुन चित्र स्पष्ट होत आहे.

मतदारांना ही कळलयं "मोठ्याच्या घरी पोरगी द्यायची, अन्‌ भेटायची अडचण करुन घ्यायची,' कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधीला भेटताना किती आडचण होते, याचा अनुभव दीड वर्षात अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे चित्र बदललेले दिसेल. बॅंकेच्या संचालकापाठोपाठ जामखेड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच, असा विश्‍वास माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. 

जामखेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री शिंदे बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी प्रदेश संघटक गणेश अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, निवडणूक निरिक्षक ऍड. अभय आगरकर, ऍड. प्रविण सानप, जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, तालुका अध्यक्ष अजय काशिद, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, सभापती गौतम उतेकर, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अभिजित राळेभात आदिंसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते. 

म्हणून मी नशिवबान 

शिंदे म्हणाले, की मी नशिबवान माणूस आहे. ग्रामपंचायतीला पडलो आणि थेट विधानसभेला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आशिर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने आमदार झालो. मंत्री झालो. असे फक्त भाजपातच होऊ शकते, असे सांगून मंत्री केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला तसेच विधानसभेला झालेल्या अनपेक्षित पराभवाची सल व्यक्त करताना ते म्हणाले, की मंत्री असताना नगरपालिकेची सत्ता विरोधात गेली होती, तरीही शहराला कोट्यवधीचा निधी दिला. विकासाची कामे केली. त्यापैकी काही सुरू आहेत. 117 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही आपणच मंजुरी आणली होती, अद्याप तिची निविदा ही निघाली नाही, असा उपरोधिक टोला दिला. 

आता तुम्ही मात्र माझी आता ऐवढी परीक्षा पाहू नका, असे सांगून नगरपालिकेला साथ देण्याचे आवहान केले. तसेच उमेदवारीविषयी बोलताना शिंदे म्हणाले, की वार्डात काम करणाऱ्यांस निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल. कोणी इकडे तिकडे पळू नका. आपल्या वार्डात काम करा. पक्ष तुम्हांला घरी येवून उमेदवारी देईल, असेही त्यांनी सांगितले. 

रोहित पवारांवर टीका 

कर्जतकर म्हणाले, की आमदार रोहित पवार बहुतेक पुढची निवडणूक कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत, तर करमाळ्यातून लढतील. त्यांचे करमाळ्याकडे अधिक लक्ष आहे. म्हणूनच त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवायला घेतलाय. लोकांना ऐकदा फसवता येते, मात्र वारंवार फसवता येत नाही; अशीही टीका त्यांनी केली. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता जामखेड नगरपालिकेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. प्रविण सानप यांनी केले, तर आभार प्रा. कविता जगदाळे यांनी मानले. 

आमदाराने पंचवीस टक्के निधी आणू दाखवावा..! 

माजी मंत्री राम शिंदे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकास कामाच्या पंचवीस टक्के विकास निधी आणून दाखवावा, केवळ मीडियावर त्यांचा विकास दिसतोय. वर्षभरात आमदाराने कोणतेच विकासाचे काम केले नाही, अशी टीका करुन पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू आणि पक्षाचे नगरसेवक निवडून आणू, अशी हमी बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी दिली. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com