गाैतम हिरण हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश ः आमदार विखे पाटील - Gaitam deer killing incident is a failure of Home Department: MLA Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

गाैतम हिरण हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश ः आमदार विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मार्च 2021

श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद विधासभेत उमटले. विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरेन यांची हत्या म्हणजे  गृहविभागाचे नियंत्रण राहिले नसल्याचा थेट आरोप केला.

मुंबई : श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या घटनेबाबत गृहमंत्र्यानी तातडीने निवेदन करावे, आशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिरन यांच्या हत्येची घटना हे गृहखात्याचे अपयश असून, गुंडावर नाही तर, सामान्य माणसांवरच पोलीसांची दहशत अधिक दिसत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद विधासभेत उमटले. विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिरेन यांची हत्या म्हणजे  गृहविभागाचे नियंत्रण राहीले नसल्याचा थेट आरोप केला.

हेही वाचा.. शेळके यांच्या रुपाने आणखी एक शिरपेचात तुरा

गृहखात्याचे कोणतेही नियंत्रण आता गुंडावर तर फक्त  सामान्य माणसांवर आहे. मुबईत आपले प्रश्न घेवून येणाऱ्यांना पोलीस धाक दाखवितात. मूठभर लोकांमुळे गृहखाते बदनाम होत असल्याकडे लक्ष वेधून आमदार विखे पाटील म्हणाले, की हिरन यांचे अपरहण झाल्यानंतर पोलीस प्रशासनास व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सर्व माहिती दिली होती. परंतू याबाबत गांभीर्य न दाखविल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या राज्यात आता आमदारांनाही फेसबुकवरून धमक्या येवू लागल्या असतील, तर गृहविभागाची सायबर शाखा काय करते, असा प्रश्नही आमदार विखे पाटील यांनी उपस्थित केला.

हेही वाचा... जिल्हा बॅंकेचा कारभार काटेकोरपणे करा

गौतम हिरण यांचे वडील  स्वातंत्र्य सेनानी होते. आशा कुटूंबितील व्यक्तीची हत्येची घटना निषेधार्ह असून, याची तातडीने चौकशी करावी, आशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

दरम्यान, तालुक्‍यातील बेलापूर येथील अपहरण झालेले व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा मृतदेह काल सकाळी वाकडी रस्त्यावरील रेल्वेमार्गासमोरील यशवंतबाबा चौकी परिसरात आढळला. बेलापूर बाह्यवळण परिसरातून एक मार्च रोजी त्यांचे अपहरण झाले होते. पोलिस तपास सुरू असताना, काल सातव्या दिवशी कुजलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह सापडला. 

बेलापूर बाह्यवळणासमोरून एक मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिरण यांचे अपहरण झाले होते. याबाबत शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, बेलापूर खुर्द व बुद्रुक येथे शनिवारी "बंद' पाळण्यात आला. बेलापूर ग्रामस्थांनी बैठक घेत, हिरण यांची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. या घटनेचे पडसात थेट विधानसभेच्या अधिवेशनात पडले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख