आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून शेवगाव-पाथर्डीसाठी मार्च एण्डची भेट - Four crore for Shevgaon-Pathardi through the efforts of MLA Monica Rajale | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून शेवगाव-पाथर्डीसाठी मार्च एण्डची भेट

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चार कोटी वीस लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

शेवगाव : शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चार कोटी वीस लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

 

शेवगाव तालुक्‍यातील आव्हाने ते भगूर या 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 45 लाख, भगूर ते वरूर या दोन किमी रस्त्यासाठी 65 लाख, खुंटेफळ ते दारकुंडे वस्ती - दादेगाव या 1.5 किमी रस्त्यासाठी 45 लाख, लाखेफळ ते कराड वस्ती या 700 मीटर रस्त्यासाठी 25 लाख, देवटाकळी ते जुने हिंगणगाव ने या 800 मीटर रस्त्यासाठी 20 लाख, बोधेगाव ते एकबुर्जी पैलवान वस्ती या 1.5 किमी रस्त्यासाठी 35 लाख, शहरटाकळी ते मनवेलीकर - पवार वस्ती या रस्त्यासाठी 25 लाखांचा निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा... सेवा संस्था होणार आॅनलाईन

पाथर्डी तालुक्‍यातील पाथर्डी ते जुना खेडे या 1.5 किमी रस्त्यासाठी 50 लाख, चिंचपूर इजदे ते पांगरा या रस्त्यावरील लहान मोरीचे बांधकाम करण्यासाठी 25 लाख, मोहोज देवढे ते काळेवाडी या 1 किमी रस्त्यासाठी 30 लाख, कळस पिंप्री ते आखेगाव या 1 किमी रस्त्यासाठी 30 लाख, वसू - गैबी सोमठाणे या रस्त्यासाठी 25 लाखाचा निधी देण्यात आला आहे.

 

हेही वाचा..

औद्योगिक सुरक्षेबाबत उद्योजकांनी पुढाकार घ्यावा

नगर : "औद्योगिक क्षेत्राची वाटचाल सध्या यशस्वितेकडे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची औद्योगिक सुरक्षा महत्त्वाची आहे. उद्योजकांनी पुढाकार घेऊन याबाबत नियोजन करावे,'' असे आवाहन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. 

हेही वाचा... अर्सेेनिक अल्बमची परिणामकारकता किती

येथील औद्योगिक सुरक्षा सप्ताहांतर्गत "मार्ग' या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित, सुरक्षा अधिकाऱ्यांचा सन्मान व 150 कारखान्यांच्या सुरक्षेबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सुरक्षा विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख, श्‍नायडर इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापक अरविंद पारगावकर, ई. एस. ई. विभागाचे दिलीप आढाव उपस्थित होते. धनंजय कुलकर्णी यांनी, कार्यक्रमाच्या ठिकाणी संकट काळात वापरावयाच्या विविध उपकरणांची व साधनांची माहिती दिली. चैतन्य खानविलकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. केंद्रीय पर्यावरण समितीवर अशासकीय सदस्यपदी पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 
पारगावकर यांनी "मार्ग'च्या उपक्रमाचे कौतुक केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख